29 C
Mumbai
Tuesday, February 24, 2026
घरराजकारणदिवंगत मेजरची पीडित मुलगी का म्हणाली, थँक यू योगी अंकल!

दिवंगत मेजरची पीडित मुलगी का म्हणाली, थँक यू योगी अंकल!

Google News Follow

Related

देशाची आन-बान राखण्यासाठी सीमारेषेवर पहारा देणाऱ्या स्वर्गीय मेजर यांच्या आजारी मुलीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्तक्षेपामुळे अवघ्या २४ तासांत न्याय मिळाल्याने, तिच्या तोंडून सहजच शब्द निघाले —
“थँक यू योगी अंकल! गॉड ब्लेस यू.” वडील मेजर बिपिन चंद्र भट्ट यांच्या निधनानंतर अंजना यांनी भाऊ आणि बहिणीलाही गमावले. सध्या त्या स्क्रिझोफ्रेनिया या गंभीर मानसिक आजाराशी झुंज देत आहेत. या अवस्थेचा गैरफायदा घेत काही भू-माफियांनी इंदिरानगरमधील त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या घरावर बेकायदेशीर कब्जा केला.

छळ आणि अन्यायाला कंटाळून अंजना यांनी बुधवारी दुपारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली आणि आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.

एका व्यक्तीच्या छळाला बळी पडलेल्या एका मेजरच्या मुलीसाठी नववर्ष २०२६ चा पहिला दिवस अपार आनंद घेऊन आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कडक आदेशानंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी अंजना यांचे कोट्यवधींचे घर त्यांना परत मिळवून दिले आणि दोन भू-माफियांना अटक केली.

रिहॅब सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या अंजना यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सांगितले की, चंदौली जिल्ह्यातील बलराम यादवने त्यांच्या घरावर कब्जा केला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना २४ तासांत न्याय मिळेल, असे आश्वासन दिले. गुरुवारी दुपारपूर्वीच जेव्हा त्यांना घराचा ताबा मिळाला, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि त्या म्हणाल्या, गॉड ब्लेस यू योगी अंकल!”

हे ही वाचा:

“आपले शेजारी वाईट आहेत” पाकिस्तानबद्दल एस जयशंकर काय म्हणाले?

आयपीएल संघात बांगलादेशी खेळाडू नको, भाजपा खासदाराचाही सवाल

नाना पटोलेंनी स्वामी रामभद्राचार्यांबद्दल केले अपमानजनक विधान

काळा लसूण : हृदय, यकृत आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर

मुख्यमंत्र्यांकडे मांडली व्यथा, २४ तासांत तोडगा

घर व जमिनीवर कब्जा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अंजना यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची विनंती केली. ३१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना बोलावून घेतले आणि एका सैनिकाच्या मुलीची वेदना लक्षपूर्वक ऐकून घेतली.

अंजना यांनी सांगितले की, चंदौलीतील बलवंत यादवने बनावट कागदपत्रांच्या आधारे घरावर कब्जा केला असून घरावर त्याचे नावाचे फलकही लावले आहेत. ६ डिसेंबर रोजी त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता; मात्र कारवाईला विलंब होत असल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.

आरोपींसह दोघांना २४ तासांत अटक

मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्यानंतर पोलीस यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली. चौकशी करून अंजना यांना त्यांच्या घराचा ताबा देण्यात आला. एसीपी गाझीपूर अनिंद्य विक्रम सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणात बलवंत कुमार यादव उर्फ बब्लू (रा. नारायणपूर, सैयदराजा, चंदौली), मनोज कुमार यादव (रा. दाऊदपूर, कोतवाली, चंदौली) या दोघांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता

रिहॅब सेंटरचे डॉक्टर संतोष दुबे यांनी सांगितले की २०१६ मध्ये अंजनांना उपचारासाठी रिहॅब सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर नियमित उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी घरावर कब्जा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली आणि २४ तासांत चौकशी करून अंजनांना घराचा ताबा देण्यात आला.

पोलीस व लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी जेव्हा अंजना घरात प्रवेश करत होत्या, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या प्रत्येक खोलीत गेल्या, भिंतींना स्पर्श करून चुंबन दिले. नंतर बाहेर येऊन नारळ फोडला, दिवा लावला आणि फुले अर्पण करून जुन्या आठवणी ताज्या केल्या.

शेजारच्या महिलांना मिठी मारून त्या रडू लागल्या आणि बालपणीच्या आठवणी सांगू लागल्या. घरात परतल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. मुख्यमंत्र्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्या म्हणाल्या, “योगी अंकल महान आहेत. त्यांनी आमच्या दुःखात मदत केली.”

अंजनांचे वडील होते लष्करातील मेजर

अंजनांचे वडील बिपिन चंद्र भट्ट भारतीय सैन्यात मेजर होते. इंदिरानगर येथील ए-४१८ क्रमांकाचे घर त्यांचे आहे.
१९९४ मध्ये त्यांचे निधन झाले. मेजर भट्ट यांना एक मुलगा आणि दोन मुली होत्या. मुलगा व एका मुलीचे निधन झाले असून अंजना या एकमेव वारस आहेत. स्किझोफ्रेनियामुळे २०१६ मध्ये अंजनांना निर्वाण रिहॅब सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत बलराम यादव आणि मनोज कुमार यादव यांनी घरावर कब्जा करून बनावट कागदपत्रांच्या आधारे मालकी आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
295,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा