30.7 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरस्पोर्ट्सदिवाळीआधीच सॅमसन, नमन धीरची आतषबाजी!

दिवाळीआधीच सॅमसन, नमन धीरची आतषबाजी!

Google News Follow

संजू सॅमसनच्या आक्रमक अर्धशतकासह नमन धीरच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडवर ४ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने दिलेल्या २२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने १९.४ षटकांत ६ विकेट्स गमावून विजयावर शिक्कामोर्तब केले.

सॅमसन-अभिषेकची वादळी सुरुवात

२२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी भारतीय संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. या जोडीने अवघ्या ५.५ षटकांत पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. अभिषेकने १२ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांसह २९ धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला तिलक वर्मा अवघ्या ६ धावांवर बाद झाला.

सॅमसनने अवघ्या २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३३ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६७ धावांची शानदार खेळी केली.

अय्यरची कर्णधाराला साजेशी खेळी

ईशान किशनला केवळ १ धाव करता आली. अक्षर पटेलने १४ चेंडूंत २४ धावा करत धावगती कायम ठेवली. त्यानंतर श्रेयस अय्यरने जबाबदारी स्वीकारत २८ चेंडूंत १ चौकार आणि २ षटकारांसह ४२ धावा केल्या. अय्यर आणि नमन धीर यांनी २२ चेंडूंत ४३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

नमन धीरची १५ चेंडूंत ४२ धावांची आतषबाजी

सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात नमन धीरने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. त्याने अवघ्या १५ चेंडूंत नाबाद ४२ धावा ठोकल्या. त्याच्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. तब्बल २८० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत त्याने भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. नीतीश कुमार रेड्डी २ धावांवर नाबाद राहिला.

न्यूझीलंडकडून मायकेल ब्रेसवेल आणि कर्णधार मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

ग्लेन फिलिप्सचे तुफानी ८२ धावा

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ४ विकेट्स गमावून २२५ धावा उभारल्या. टिम सीफर्ट आणि फिन अॅलन यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. सीफर्टने १७ चेंडूंत २४, तर अॅलनने २४ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावा केल्या. डॅरिल मिचेलने २८, तर बेव्हन जेकब्सने १६ चेंडूंत ३१ धावांचे योगदान दिले.

ग्लेन फिलिप्सने एका बाजूने आक्रमक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्याने अवघ्या ४० चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ८२ धावा फटकावल्या. त्याचा स्ट्राइक रेट २०५ होता.

भारताकडून अर्शदीप सिंह, मयंक यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. मात्र, न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखण्यात भारतीय गोलंदाजांना अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही फलंदाजांच्या आक्रमक कामगिरीमुळे भारताने पहिल्या टी-२० सामन्यात विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा