28.9 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरस्पोर्ट्सविक्रमाचा चुराडा! न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा अभेद्य फॉर्म्युला फोडला

विक्रमाचा चुराडा! न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा अभेद्य फॉर्म्युला फोडला

Google News Follow

अफगाणिस्तानची गोलंदाजी, विशेषतः फिरकी मारा, जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम मानला जातो. फिरकीस पोषक खेळपट्टीवर कोणत्याही बलाढ्य संघाला धक्का देण्याची क्षमता या संघात आहे. मात्र चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमच्या फिरकीस अनुकूल खेळपट्टीवरच अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आणि टी-२० विश्वचषक २०२६ मधील सामन्यात न्यूझीलंडकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांचा एक मोठा विक्रमही मोडला.

या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानने टी-२० क्रिकेटमध्ये २५ वेळा प्रथम फलंदाजी करताना १८० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या होत्या आणि प्रत्येक वेळी विजय मिळवला होता. मात्र न्यूझीलंडविरुद्ध हा विजयाचा सिलसिला खंडित झाला. १८२ धावा करूनही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. २६ प्रयत्नांमध्ये पहिल्यांदाच १८० पेक्षा जास्त धावा करूनही अफगाणिस्तान हरला.

सामन्याचा आढावा घेतल्यास, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत गुलबदीन नायबच्या ६३ धावांच्या खेळीच्या जोरावर १८२ धावांचा डोंगर उभा केला. गोलंदाजीची सुरुवातही दमदार झाली होती. दुसऱ्याच षटकात फिरकीपटू मुजीबने सलग दोन चेंडूंवर दोन बळी घेत न्यूझीलंडला धक्का दिला. मात्र त्यानंतर अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांना त्यांच्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.

न्यूझीलंडने सलामीवीर टिम सिफर्टच्या ६५ धावांच्या जोरावर १७.५ षटकांत ५ बाद १८३ धावा करत सामना ५ गडी राखून जिंकला आणि अफगाणिस्तानचा अभेद्य वाटणारा विक्रम मोडीत काढला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा