23.2 C
Mumbai
Tuesday, January 20, 2026
घरस्पोर्ट्सएलिसा हिलीचा संन्यास; भारताविरुद्ध अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका

एलिसा हिलीचा संन्यास; भारताविरुद्ध अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका

Google News Follow

Related

ऑस्ट्रेलियाची कर्णधार आणि दिग्गज विकेटकीपर-फलंदाज एलिसा हीली हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताविरुद्ध फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या घरच्या मालिकेनंतर ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणणार आहे. त्यामुळे ही भारताविरुद्धची मालिका तिच्या कारकिर्दीतील अखेरची ठरेल.

हिलीने स्पष्ट केले आहे की, यावर्षी होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकाच्या तयारीचा विचार करता ती भारताविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहभागी होणार नाही. मात्र पर्थ येथे होणाऱ्या वनडे मालिकेत आणि एका डे-नाईट कसोटी सामन्यात ती ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे.

निवृत्तीबाबत प्रतिक्रिया देताना हिली म्हणाली, “देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान हा माझ्यासाठी नेहमीच सर्वोच्च सन्मान राहिला आहे. भारताविरुद्धची आगामी मालिका माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची शेवटची मालिका असेल.”

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी हिलीला ‘ऑल-टाइम ग्रेट’ खेळाडूंमध्ये गणले असून, ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटमधील तिच्या अमूल्य योगदानाचे कौतुक केले आहे.

२०१० मध्ये अवघ्या १९ व्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हिलीला महिला क्रिकेटमधील सर्वात आक्रमक फलंदाजांपैकी एक आणि उत्कृष्ट विकेटकीपर म्हणून ओळखले जाते. ती आठ आयसीसी विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग राहिली आहे—यामध्ये सहा टी-२० आणि दोन वनडे विश्वचषकांचा समावेश आहे. २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघातही तिचा समावेश होता.

हेही वाचा :

जगातील सर्वात मोठ्या ३३ फुटी शिवलिंगाची होणार प्राणप्रतिष्ठा

‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे त्रि-सेवा सहकार्याचे सर्वोत्तम उदाहरण!

भाजप महायुती उमेदवार अंजली सामंत यांची प्रचारात मुसंडी

“फक्त फोटो दाखवून विकास होत नाही…”

मेग लॅनिंगच्या निवृत्तीनंतर २०२३ मध्ये हिलीची ऑस्ट्रेलियाच्या पूर्णवेळ कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. कर्णधार म्हणून इंग्लंडविरुद्ध १६-० असा बहुप्रकारातील अ‍ॅशेस ‘व्हाइटवॉश’ ही तिची मोठी कामगिरी मानली जाते. तिच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २०२४ महिला टी-२० विश्वचषक आणि २०२५ महिला वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही धडक मारली. विश्वचषक अंतिम सामन्यातील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आणि आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १२६ डिसमिसल्सचा विक्रमही तिच्याच नावावर आहे.

ऑस्ट्रेलियासाठी हिलीने आतापर्यंत १६२ टी-२०, १२६ वनडे आणि ११ कसोटी सामने खेळले आहेत. बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सकडून ११ हंगामांत तिने ३,००० हून अधिक धावा केल्या असून, दोन बीबीएल विजेतेपदांची ती मानकरी आहे. तसेच विमेन्स प्रीमियर लीगमध्ये ती यूपी वॉरियर्सची कर्णधारही राहिली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा