29 C
Mumbai
Friday, October 9, 2026
घरस्पोर्ट्सविश्वविजेत्याला चीतपट करत अमन सहरावतचा सुवर्णविजय!

विश्वविजेत्याला चीतपट करत अमन सहरावतचा सुवर्णविजय!

Google News Follow

Related

एशियन गेम्स २०२६ मध्ये भारताच्या कुस्तीपटू अमन सहरावतने ५७ किलो फ्रीस्टाइल गटात सुवर्णपदक पटकावत देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. रोमांचक अंतिम सामन्यात अमनने विद्यमान विश्वविजेता दक्षिण कोरियाच्या चोंग-सोंगचा ११-७ असा पराभव केला.

अमनसाठी हा एशियन गेम्समधील सलग दुसरा पदकविजय ठरला. मागील एशियन गेम्समध्ये त्याने कांस्यपदक मिळवले होते. यावेळी पदकाचा रंग बदलत अमनने थेट सुवर्णपदकावर नाव कोरले.

अखेरच्या मिनिटात अमनचा जबरदस्त पलटवार

अंतिम सामन्यात अमनने सुरुवातीला आघाडी घेतली. दुखापतीच्या ब्रेकनंतर त्याने आक्रमक खेळ करत ६-१ अशी आघाडी मिळवली. मात्र, चोंग-सोंगने जोरदार पुनरागमन करत अमनची आघाडी कमी केली आणि काही वेळासाठी स्वतः आघाडीवरही गेला.

मात्र निर्णायक क्षणी अमनने आपला अनुभव आणि ताकद पणाला लावत शानदार डाव साधला. प्रतिस्पर्ध्याला पूर्णपणे लॉक करून त्याला पलटवत अमनने चार महत्त्वाचे गुण मिळवले. या निर्णायक डावामुळे सामन्याचे पारडे पुन्हा अमनच्या बाजूने झुकले आणि त्याने ११-७ असा विजय मिळवत सुवर्णपदकावर कब्जा केला.

अमनने स्पर्धेची सुरुवात जपानच्या यामातो ओगावा याच्यावर २०-९ अशा तांत्रिक श्रेष्ठतेच्या विजयाने केली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तानच्या नुरदानत ऐतानोवचा १२-१ असा पराभव केला.

उपांत्य फेरीत ताजिकिस्तानच्या आयाल बेलोल्युब्स्कीविरुद्ध अमन पहिल्या फेरीनंतर २-६ असा पिछाडीवर होता. मात्र दुसऱ्या फेरीत त्याने जबरदस्त पुनरागमन करत १२ गुण मिळवले आणि केवळ २ गुण दिले. अखेर अमनने हा सामना १४-८ असा जिंकत अंतिम फेरी गाठली.

कुस्तीत भारताचे दुसरे सुवर्ण

एशियन गेम्स २०२६ मधील कुस्तीमध्ये हे भारताचे दुसरे सुवर्णपदक ठरले. यापूर्वी सुजीत कलकलने फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. अमनच्या या विजयानंतर भारतीय कुस्तीपटूंनी स्पर्धेत आपली दमदार कामगिरी कायम ठेवली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा