29.5 C
Mumbai
Saturday, November 28, 2026
घरस्पोर्ट्सगं. द.आंबेकर चषक कबड्डी क्रीडा स्पर्धा ७ डिसेंबरपासून

गं. द.आंबेकर चषक कबड्डी क्रीडा स्पर्धा ७ डिसेंबरपासून

Google News Follow

गिरणगावात गेल्या पन्नास वर्षापेक्षा अधिककाळ चर्चेत असलेल्या गं.द. आंबेकर चषकासाठीच्या मुंबई शहर कबड्डी स्पर्धांना येत्या ७ डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे. यंदाच्या सर्वच स्पर्धा चुरशीच्या आणि प्रेक्षणीय करण्याचा आयोजकांचा संकल्प आहे. कामगारनेते आणि विधान परिषदेचे उपनेते सचिन अहिर, सरचिटणीस गोविंद मोहिते, क्रीडा प्रमुख उपाध्यक्ष सुनील बोरकर आणि खजिनदार निवृत्ती देसाई यांच्यामध्ये या प्रश्नावर नुकतीच चर्चा झाली आहे.

यंदा व्यवसायिक पुरुषगटाच्या स्पर्धेसाठी नामवंत १६ संघ, स्थानिक महिला गटामध्ये नामवंत बारा संघ आणि महाविद्यालयीन ८ संघ खेळविण्यात येणार आहेत. दिनांक ७ ते १२ डिसेंबर पर्यंत,मुंबई शहर कबड्डीची पंढरी म्हटले जाते,अशा ना.म जोशी मार्गावरील श्रमिक जिमखाना येथे संध्याकाळच्या वेळात या सर्व स्पर्धा बरोबर खेळविल्या जाणार आहेत‌.

हे ही वाचा:

झेल पकडण्यातल्या चुकांचा फटका भारताला बसला

‘ओंकार’ हत्ती पुन्हा आपल्या कुटुंबाच्या कळपात

काँग्रेसने जुनी मानसिकता बदलून विधेयकाला पाठिंबा द्यावा!

अफगाणिस्तानमध्ये शाळेत भीषण स्फोट

शूटिंग बॉल स्पर्धा शनिवार 12 डिसेंबर रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत याच मैदानावर खेळविल्या जाणार आहेत. या स्पर्धेत १२ नामवंत संघ खेळणार ‌आहेत. एकूण कामगार भागात राहणाऱ्या क्रीडा रसिकाला ही क्रीडा स्पर्धा पर्वणीच ठरणार आहे!

त्याअनुषंगाने संघाचे संघटन सेक्रेटरी प्रकाश भोसले, अशोक चव्हाण,अनिल पाटील,आदी क्रीडा संघटक या स्पर्धा निकोप आणि खुल्या वातावरणात पार पडण्यासाठी सर्वतोपरी परिश्रम घेत आहेत.तरी या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संघांनी संघटक हर्षल गुरव, (फोन नंबर ९००४६८३१२२) यांच्याकडून कबड्डी खेळाचे प्रवेश अर्ज सकाळी ११ ते ४ या वेळेत घेऊन जायचे आहेत आणि जमाही करावयाचे आहेत असे संघटनेने म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा