30 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरस्पोर्ट्सआर्यवीर सेहवागच्या वादळी शतकाने टीम इंडिया उपांत्य फेरीत

आर्यवीर सेहवागच्या वादळी शतकाने टीम इंडिया उपांत्य फेरीत

Google News Follow

अंडर-१९ आशिया चषक २०२६ स्पर्धेत भारताच्या युवा संघाने दमदार कामगिरी करत संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) ७० धावांनी पराभव केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो आर्यवीर सेहवाग. त्याने १६८ चेंडूंत १६० धावांची तुफानी खेळी करत भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली.

अल अमिरात क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. कर्णधार लक्ष्य रायचंदानी आणि आर्यवीर सेहवाग यांनी पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. लक्ष्य १७ धावा करून बाद झाला. त्यानंतर आर्यवीरने व्ही. के. विनीतच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी १९३ धावांची भक्कम भागीदारी रचली. आर्यवीरने आपल्या खेळीत ७ षटकार आणि १७ चौकारांची आतषबाजी केली. विनीतनेही ६९ चेंडूंत ६७ धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारताला ५० षटकांत २५५ धावांपर्यंत मजल मारता आली. यूएईकडून नसीम खानने चार विकेट घेतल्या.

विजयासाठी २५६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या यूएईने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. मात्र, त्यांचा संपूर्ण संघ २३९ धावांवर बाद झाला. अहमद खुदादादने ७४ धावांची खेळी करत भारताच्या गोलंदाजांसमोर आव्हान निर्माण केले. त्याला नूरुल्लाह अयोबीने ३९ धावांची साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ९० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र, ही भागीदारी तुटल्यानंतर यूएईचा डाव कोसळला.

भारताकडून ईशान सूदने प्रभावी गोलंदाजी करत ३७ धावांत चार विकेट घेतल्या. इतर गोलंदाजांनीही प्रत्येकी एक विकेट घेत विजयात योगदान दिले.

या विजयासह भारताने उपांत्य फेरी-२ मध्ये स्थान मिळवले असून, १२ नोव्हेंबर रोजी भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. तर पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेश आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे अंतिम फेरीसाठी रंगतदार लढती पाहायला मिळणार आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा