28.2 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरस्पोर्ट्ससेपकटकरावमध्ये भारताची कांस्य कमाई; जपानकडून ०-२ पराभव

सेपकटकरावमध्ये भारताची कांस्य कमाई; जपानकडून ०-२ पराभव

Google News Follow

Related

एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय पुरुष क्वाड्रंट संघाने सेपकटकरावमध्ये कांस्यपदक पटकावले. नागोया सिटी मिजुहो पार्क जिम्नॅशियममध्ये झालेल्या उपांत्य सामन्यात भारताला यजमान जपानकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, उपांत्य फेरीपर्यंत मजल मारल्यामुळे भारताच्या खात्यात कांस्यपदक जमा झाले.

मालेमंगनबा सिंह सोरोखाइबाम, राम कुमार शर्मा, बॉबी कुमार आणि आकाश युमनाम यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. जपानविरुद्धच्या दोन्ही गेममध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली झुंज दिली. पहिला गेम भारताने १२-१५ असा गमावला, तर दुसऱ्या गेममध्येही जपानने १५-१३ अशी बाजी मारली.

साखळीत भारताची दमदार कामगिरी

भारतीय पुरुष क्वाड्रंट संघाने साखळी फेरीत तिन्ही सामने जिंकत गट ‘अ’मध्ये अव्वल स्थान मिळवले होते. भारताने वर्ल्ड कप विजेत्या म्यानमारला धक्का देत व्हिएतनाम आणि लाओसवरही विजय मिळवला. या कामगिरीच्या जोरावर भारताने उपांत्य फेरी गाठली.

सेपकटकरावमध्ये भारताचे तिसरे पदक

एशियन गेम्सच्या इतिहासात सेपकटकरावमध्ये भारताचे हे तिसरे पदक ठरले. यापूर्वी भारताने २०१८ जकार्ता एशियन गेम्समध्ये पुरुषांच्या टीम रेगूमध्ये कांस्य, तर २०२३ हांगझोऊ एशियन गेम्समध्ये महिलांच्या टीम रेगूमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

महिला संघाचे आव्हान साखळीतच संपले

भारतीय महिला संघाला मात्र साखळी फेरीत एकही विजय मिळवता आला नाही. गट ‘अ’मध्ये भारत चौथ्या स्थानावर राहिला. महिलांच्या डबल्समध्येही भारताला तिन्ही सामन्यांत विजय मिळवता आला नाही.

पुरुषांच्या रेगू संघालाही बाद फेरी गाठता आली नाही. १ विजय आणि २ पराभवांसह भारत गट ‘ब’मध्ये तिसऱ्या स्थानावर राहिला.

भारताच्या खात्यात ६ पदके

शुक्रवारी भारताने विविध क्रीडा प्रकारांत चमकदार कामगिरी केली. भारताच्या खात्यात आतापर्यंत २ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण ६ पदके जमा झाली.

बॉक्सिंगमध्ये लवलीना बोरगोहेनने ७५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. तिरंदाजीतील महिला रिकर्व संघाने दक्षिण कोरियाचा पराभव करत सुवर्ण मिळवले. कुमकुम मोहोड-धीरज बोम्मादेवरा आणि पुरुष रिकर्व संघाने रौप्यपदक पटकावले. नौकानयनात नेत्रा कुमाननने कांस्यपदक मिळवले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा