बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात एकमेव बदल

अपयशी ठरलेल्या जेक वेदराल्डला वगळले

बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात एकमेव बदल

डार्विनमध्ये बांगलादेशविरुद्ध पहिली कसोटी गमावलेल्या ऑस्ट्रेलियाने २२ ऑगस्टपासून साउथ मॅके येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी आपल्या १३ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पहिल्या कसोटीत अपयशी ठरलेल्या सलामीवीर जेक वेदराल्डला संघातून वगळण्यात आले आहे.

जेक वेदराल्ड पहिल्या कसोटीत अपयशी ठरला होता. त्याने पहिल्या डावात २३ धावा आणि दुसऱ्या डावात शून्य धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन संघात वेदराल्डच्या रूपाने एकमेव बदल करण्यात आला आहे. त्याच्या जागी संघात मॅट रेनशॉचा समावेश करण्यात आला आहे. तो ट्रेविस हेडसोबत डावाची सुरुवात करू शकतो.

रेनशॉने १४ कसोटी सामन्यांतील २४ डावांमध्ये १ शतक आणि ३ अर्धशतकांच्या मदतीने ६४५ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या १८४ आहे.

हे ही वाचा:

बेल्जियमच्या जंगलात आगीचे तांडव

काझीरंगाभोवतीचा १० किमी संवर्धन पट्टा घटवण्याचा सरकारचा प्रस्ताव

नॅस्डॅककडून २३ तास शेअर ट्रेडिंगची तयारी

इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला केंद्राचा ‘बूस्टर डोस’

डेव्हिड वॉर्नरने २०२४ च्या सुरुवातीला निवृत्ती घेतल्यानंतर रेनशॉ हा ऑस्ट्रेलियाचा सातवा सलामीवीर ठरणार आहे. ट्रेविस हेड, स्टीव्ह स्मिथ, नॅथन मॅकस्वीनी, सॅम कॉन्स्टास, मार्नस लाबुशेन आणि त्यानंतर वेदराल्ड यांचा सलामीवीर म्हणून वापर करण्यात आला आहे.

मार्नस लाबुशेन आपले स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे; मात्र पहिल्या कसोटीत अपयशी ठरल्यानंतर त्याच्यावर दबाव आहे. लाबुशेनला डार्विनमध्ये १ आणि ३१ धावा करता आल्या. लाबुशेनला अंतिम अकरामध्ये स्थान मिळवण्यात यश आले, तर त्याच्यावर धावा करण्याचा मोठा दबाव असेल. आणखी एक अपयश त्याला संघाबाहेर करू शकते.

ऑस्ट्रेलियाचा मागील कसोटी सामन्यात खराब फलंदाजीमुळे पराभव झाला होता. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांबरोबरच गोलंदाजांनाही आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. ऑस्ट्रेलियाने दुसरी कसोटी जिंकली नाही, तर बांगलादेशविरुद्ध प्रथमच कसोटी मालिका गमावण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते.

ऑस्ट्रेलियाचा संघ:

ट्रेविस हेड, मॅट रेनशॉ, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, कॅमरून ग्रीन, ॲलेक्स कॅरी, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, स्कॉट बोलंड.

Exit mobile version