29 C
Mumbai
Monday, March 2, 2026
घरस्पोर्ट्सआयुष तांडेल ठरला 'ज्युनियर मुंबई श्री'

आयुष तांडेल ठरला ‘ज्युनियर मुंबई श्री’

दिव्यांग मुंबई श्री मेहबूब शेख तर ज्युनियर मुंबई मेन्स फिजिक मंथन पाटील

Google News Follow

Related

शरीरसौष्ठव खेळाचे आकर्षण असलेल्या ज्युनियर मुंबई श्री स्पर्धेत आयुष तांडेलने बाजी मारली. तसेच दिव्यांग मुंबई श्री स्पर्धेत मेहबूब शेखने आपले वर्चस्व दाखविताना दिव्यांग मुंबई श्री किताबावरती आपले नाव कोरले. ज्युनियर मुंबई मेन्स फिजिक प्रकारात मंथन पाटील विजेता ठरला. मास्टर्स मुंबई श्री मध्ये अरुण पाटील (४० ते ५० वर्षे ) जगदीश कावणकर (५० ते ६० वर्षे ), सुनील राऊत (६० वर्षेवरील ) यांनी सोनेरी यश संपादिले.

मालाड पूर्वेला दीनदयाळ उपाध्याय मैदानावर हजारो क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत तब्बल २५३ शरीरसौष्ठवपटुंचा पीळदार शरीरसौष्ठवाचा थरार रंगला. जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्ट आयोजित बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेच्या मान्यतेने रंगलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटामध्ये अत्यंत जोरदार चुरस पाहायला मिळाली. ज्युनियर मुंबई श्री नव्हेच तर फिजिक प्रकारातही खेळाडूंचा लाभलेला प्रतिसाद डोळे विसफरणारा होता. तसेच मास्टर्स मुंबई श्री लाही मोठ्या संख्येने स्पर्धक उतरल्यामुळे सर्चचं गटात शरीरसौष्ठवाचा थरार अनुभवायला मिळाला.

हे ही वाचा:

जेन झी मध्ये आरोग्याबाबत वाढती जागरूकता आणि नवे ट्रेंड

सकाळी उठल्यावर सांधे जकडतात?

वसई- विरार महापालिकेत आता भाजपचा आवाज घुमणार!

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी

सहा वर्षाच्या रचित उमेश पांचाळ या छोट्या शरीरसौष्ठवपटूने उपस्थितांना त्याच्या लाजवाब पोजिंगने मंत्रमुग्ध केले.
ज्युनियर मुंबई श्रीच्या ‘किताब विजेत्यांच्या लढतीत आयुष्य तांडेलने अर्पण सकपाळ, ऋषिकेश मेहेर व मंथन पाटील यांचे कडवे आव्हान मोडीत काढले. मास्टर्स मुंबई श्री स्पर्धेमध्येही तगडे स्पर्धक उतरल्यामुळे उपस्थित असलेल्या वयस्कर क्रीडाप्रेमींचीही छाती अभिमानाने फुगली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आमदार अतुल भातखळकर, नगरसेवक अजित रावराणे, नगरसेवक ऍड. सिद्धांत शर्मा, अमोल कीर्तिकर, विजय भोसले जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्टचे श्री रामचंद्र निवंगुणे, श्री तुकाराम शेलार, महीपत बामगुडे, दत्ताराम कदम, अब्दुल मुकादम तानाजी पवार यांच्यासह शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, किट्टी फणसेका, सरचिटणीस राजेश सावंत, विशाल परब, सुनील शेगडे, राम नलावडे, किरण कुडाळकर, राजेश निकम, जयदीप पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.

ज्युनियर मुंबई श्री गटनिहाय निकाल

५५ किलो – सिद्धांत लाड (परब फिटनेस), समीर बईकर (बीएसएन जिम), प्रणव पवार (बालमित्र व्यायाम शाळा), रमण राठोड (बोवलेकर जिम ), साई कुमार कोजीगी (विराज फिटनेस)
६० किलो – तेजस शेडगे (बॉडी वर्कशॉप), जय पाटील (शिव सम्राट व्यायाम शाळा) रोहन भोसले (बी फिटनेस), दिनेश विश्वकर्मा (मालाड व्यायाम शाळा), अविनाश गोरीवले (स्लिम अँड टोन)
६५ किलो – मंथन पाटील (बॉडी वर्कशॉप) सुमित श्रीवास्तव (परब फिटनेस ) करण सावंत (शिवाजी जिम), अनमोल उभारे (परब फिटनेस), तेजस टाक (पोश्चर फिटनेस)
७० किलो – अर्पण सकपाळ (परब फिटनेस), श्रीतेज जाधव (माँसाहेब जीम), भावेश ढगे (बॉडी वर्कशॉप) करण पटेल (शिवशक्ती जीम), सुरज यादव (शिवाजी जिम)
७५ किलो – ऋषिकेश मेहेर (आर्यन पॅराडाईज), दरीस डाबरे (शोएब फिटनेस), चिराग निवेदे (परब फिटनेस), निरंजन यादव (विराज फिटनेस), रोहित यादव (जय हनुमान व्यायाम शाळा)
७५ किलोवरील – आयुष तांडेल परब फिटनेस जीवन सकपाळ बालमित्र जिम अर्णव सकपाळ (परब फिटनेस), रियान कोळी (श्री गुरुदत्त जिम), करण शिरकर (जय भवानी व्यायाम शाळा)

दिव्यांग मुंबई श्री गटनिहाय निकाल

मेहबूब शेख (आयकॉन फिटनेस) सुधीर मानकर (बी फिटनेस) आकाश शेजवळ (समर्थ जीम), निलेश भंडारी (जय हनुमान व्यायाम शाळा) सूर्यकांत दुर्गाविले (यंगस्टार जिम )

 

मास्टर्स मुंबई श्री गटनिहाय निकाल

मास्टर्स ४० ते ५० वर्षे
अरुण पाटील (सालम जीम ) उदय गुजर ( शिवशक्ती जिम), कु.कोइरामा (प्रिन्स फिटनेस), कार्तिक मंडळ ( बालमित्र जिम ) अमित दास (माँसाहेब जीम),
मास्टर्स ५० ते ६० वर्षे
जगदीश कावणकर ( मारुती जिम ), मंगेश भोगले (आय यु फिटनेस), कमलेश मंगे (स्ट्रॉंग लाईफ), राजेश कडवेल (युनिक फिटनेस), दत्तात्रय पोखरकर (जनजागृती जिम),
मास्टर्स ६० वर्षे वरील
सुनील राऊत (नवमहाराष्ट्र जीम), विष्णू देशमुख (गजानन केणी जीम) प्रकाश कासले (जय हनुमान जीम), अनिल जैतापकर (फिट लाईन)

जूनियर मुंबई मेन्स फिजिक निकाल

मंथन पाटील (बॉडी वर्कशॉप), श्रीतेज जाधव (माँसाहेब जीम), अनिल राजे (परब फिटनेस), संकेत पवार (आय क्यू फिटनेस), रोशन भोसले (व्ही फिटनेस)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा