32 C
Mumbai
Sunday, November 15, 2026
घरस्पोर्ट्सयुवा टीम इंडियाच्या जल्लोषावर टीका; पण बीसीसीआयकडून पाठराखण

युवा टीम इंडियाच्या जल्लोषावर टीका; पण बीसीसीआयकडून पाठराखण

पाकिस्तानी खेळाडूंकडे पाहात केले होते हावभाव

Google News Follow

पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात थरारक विजय मिळवल्यानंतर भारतीय युवा खेळाडूंनी केलेल्या जल्लोषावरून सुरू झालेल्या चर्चेदरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजीत सैकिया यांनी खेळाडूंची पाठराखण केली आहे. संपूर्ण सामन्यात पिछाडीवर असतानाही भारतीय संघाने विजय मिळवला. त्यामुळे खेळाडूंनी व्यक्त केलेल्या आनंदाच्या भावना स्वाभाविक असून, त्यांना जल्लोष करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे सैकिया यांनी स्पष्ट केले.

विजयानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानावर धाव घेत जल्लोष केला. उल्वाला तिरंग्यात गुंडाळण्यात आले. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये भारतीय खेळाडू पाकिस्तानचा यष्टिरक्षक हमजा जहूर आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या दिशेने काही आक्रमक हावभाव करताना दिसल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे या सेलिब्रेशनवर काही क्रिकेट चाहत्यांनी टीका केली. भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांनीही यावेळी हस्तक्षेप केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा:

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा वरिष्ठ कमांडर ठार

लक्ष्य सेनने जिंकला कुमामोटो मास्टर्सचा किताब

‘एक्स मुस्लिम’ साहिल यांच्यावर नवी मुंबईत जीवघेणा हल्ला

तीन वर्षांनंतर पाकिस्तानी मंत्री भारत दौऱ्यावर

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सैकिया यांना शनिवारी ओमानमध्ये पाकिस्तानविरुद्ध एक गडी राखून मिळवलेल्या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी केलेल्या आक्रमक सेलिब्रेशनबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी खेळाडूंच्या भूमिकेचे समर्थन केले.

सैकिया म्हणाले, “हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि संघर्ष करण्याच्या वृत्तीचे दर्शन घडवते. आजचा सामना किती अटीतटीचा होता, याचा विचार करा. एका क्षणी हा सामना भारताच्या बाजूने अजिबात दिसत नव्हता. तरीही भारतीय संघाने विजय मिळवला. यावरून संघाचा आत्मविश्वास आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती दिसून येते.” ते पुढे म्हणाले, “अशा कठीण परिस्थितीतून सामना जिंकल्यानंतर खेळाडूंनी आनंद साजरा करणे स्वाभाविक आहे. त्यांना तसे करू दिले पाहिजे.”

पाकिस्तानविरुद्ध आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विजय मिळवणे ही भारतीय युवा संघासाठी महत्त्वाची कामगिरी ठरली. त्यामुळे खेळाडूंनी आनंद व्यक्त करण्याबाबत फारसा वाद नसला, तरी प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या दिशेने करण्यात आलेल्या कथित हावभावांवरून चर्चा सुरू झाली आहे.

मोठ्या विजयाचा आनंद साजरा करणे आणि पराभूत प्रतिस्पर्धी खेळाडूंना उद्देशून हावभाव करणे या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचे मत काही चाहत्यांनी व्यक्त केले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा