34 C
Mumbai
Thursday, March 5, 2026
घरस्पोर्ट्सटेनिस कोर्टवरील 'क्वीन' स्टेफी ग्राफ – एका फॅनने केलं प्रपोज, दुसऱ्याने ओलांडल्या...

टेनिस कोर्टवरील ‘क्वीन’ स्टेफी ग्राफ – एका फॅनने केलं प्रपोज, दुसऱ्याने ओलांडल्या मर्यादा

Google News Follow

Related

टेनिस जगतात एक सर्वाधिक प्रतिष्ठेचं नाव म्हणजे स्टेफी ग्राफ. १४ जून १९६९ रोजी जर्मनीच्या मॅनहाईम येथे जन्मलेल्या या टेनिसपटूने आपल्या कारकिर्दीत २२ ग्रँड स्लॅम किताब जिंकून जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या खेळाच्या शैलीने, प्रखर ताकदीच्या फोरहँडने आणि मैदानावरील वर्चस्वाने स्टेफी ग्राफने एक पर्व तयार केलं.

स्टेफी ग्राफची लोकप्रियता एवढी होती की तिच्या चाहत्यांनी अनेकदा अजबप्रकार केले.
१९९५ मध्ये विंबलडन स्पर्धेदरम्यान, जेव्हा स्टेफी सर्विससाठी तयार होती, तेव्हा एका चाहत्याने तिला प्रपोज केलं. संपूर्ण कोर्टमध्ये ओरडून तो म्हणाला, “Steffi, will you marry me?”
स्टेफीनेही मिश्कीलपणे त्याला उत्तर दिलं – “How much money do you have?”
या प्रसंगावरून तिचं विनोदी आणि सहज स्वभाव प्रकट झाला.

मात्र स्टेफी ग्राफशी संबंधित एक अत्यंत धक्कादायक घटना १९९३ मध्ये घडली होती.
३० एप्रिल रोजीच्या एका सामन्यात स्टेफीचा चाहता असलेल्या एका मानसिक रुग्णाने तिची प्रतिस्पर्धी मोनिका सेलेसच्या पाठीवर चाकूने हल्ला केला. या घटनेनंतर मोनिका सेलेस अनेक महिने टेनिसपासून दूर राहिली आणि तिचा करिअर ग्राफ मोठ्या प्रमाणात खाली गेला.

स्टेफी ग्राफच्या यशस्वी कारकिर्दीतील काही ठळक टप्पे असे:

  • फ्रेंच ओपन विजेतेपद: १९८७, १९८८, १९९३, १९९५, १९९६, १९९९

  • ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद: १९८८, १९८९, १९९०, १९९४

  • यूएस ओपन विजेतेपद: १९८८, १९८९, १९९३, १९९५, १९९६

१९९९ मध्ये विंबलडनच्या अंतिम सामन्यात पराभव आणि वारंवारच्या दुखापतींमुळे स्टेफी ग्राफने १६ वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवली.

२००१ साली तिने प्रसिद्ध टेनिसपटू आंद्रे अगासीशी विवाह केला. या जोडप्याला दोन मुले आहेत – जेडन गिल अगासी आणि जॅझ एली.

आजही स्टेफी ग्राफ टेनिसच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आणि प्रतिष्ठित खेळाडूंपैकी एक मानली जाते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा