38 C
Mumbai
Tuesday, October 13, 2026
घरस्पोर्ट्स‘खेलो इंडिया’ बॉक्सिंग सेंटरसाठी होणार ३० खेळाडूंची निवड

‘खेलो इंडिया’ बॉक्सिंग सेंटरसाठी होणार ३० खेळाडूंची निवड

जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन

Google News Follow

Related

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा २०२६–२७ दिनांक २१ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धारावी, सायन (पश्चिम), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

आई कामाख्याचे दर्शन घेतल्याने संगीतकार सलीम मर्चंट ट्रोल

तीन बड्या वृत्तसंस्थांना व्हाईट हाऊसचे दरवाजे बंद!

मालवणीत रिझवानने १४ वर्षीय मुलाच्या गळ्यावर फिरवला चाकू

देश बदलणारी मोदींची ‘घाऊक’ नीती!

मुंबई शहरामध्ये सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ बॉक्सिंग सेंटरसाठी गुणवत्तापूर्ण खेळाडूंची निवड या जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेतून करण्यात येणार आहे. यामध्ये १५ मुले व १५ मुली, अशा एकूण ३० गुणवंत बॉक्सिंग खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना ‘खेलो इंडिया’ बॉक्सिंग सेंटरमध्ये प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून, या माध्यमातून मुंबई शहरातील शालेय स्तरावरील बॉक्सिंग खेळाला अधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडू, क्रीडा शिक्षक व मार्गदर्शकांनी याची नोंद घ्यावी.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा