30 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरस्पोर्ट्सअल्काराज सज्ज; जपान ओपननंतर शांघाय मास्टर्सवर डोळा

अल्काराज सज्ज; जपान ओपननंतर शांघाय मास्टर्सवर डोळा

Google News Follow

Related

जपान ओपनचे विजेतेपद पटकावल्यानंतर स्पेनचा स्टार टेनिसपटू कार्लोस अल्काराज आता शांघाय मास्टर्सच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेपूर्वी अल्काराजने आपण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे फ्रेश असून शांघाय मास्टर्समध्ये विजेतेपदासाठी सर्वस्व पणाला लावणार असल्याचे सांगितले.

स्पर्धेपूर्वी पत्रकार परिषदेत अल्काराज म्हणाला, “मी मानसिकदृष्ट्या फ्रेश आहे आणि माझ्यासाठी हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. या स्पर्धेचे आव्हान स्वीकारण्यासाठी मी तयार आहे. मला ही स्पर्धा जिंकायची आहे. या स्पर्धेतील विजयामुळे उर्वरित हंगामासाठी मला अतिरिक्त आत्मविश्वास मिळेल.”

अल्काराजने यूएस ओपन २०२६मध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, गतविजेतेपद राखण्यात त्याला अपयश आले. अमेरिकेच्या बेन शेल्टनकडून त्याला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर टोकियोमध्ये झालेल्या जपान ओपनमध्ये त्याने शानदार पुनरागमन करत यंदाचे तिसरे टूर-लेव्हल विजेतेपद पटकावले.

यापूर्वी अल्काराजने ऑस्ट्रेलियन ओपन आणि कतार ओपनचे विजेतेपदही मिळवले आहे.

रूनच्या पुनरागमनाबद्दल अल्काराज आशावादी

अल्काराजने ऑगस्टमध्ये डेन्मार्कच्या होल्गर रूूनसोबत एका आठवड्याचे प्रशिक्षण घेतले होते. अॅकिलीसच्या दुखापतीमुळे जवळपास ११ महिने टेनिसपासून दूर राहिल्यानंतर रूनने कोर्टवर पुनरागमन केले आहे.

रूनच्या दुखापतीबाबत अल्काराज म्हणाला, “ही खूप गुंतागुंतीची दुखापत आहे आणि त्यातून सावरण्याची प्रक्रिया संथ आहे. टेनिसमध्ये हालचाल अत्यंत महत्त्वाची असते. रूनच्या खेळाची शैलीही कोर्टवर वेगाने हालचाल करण्यावर आणि संपूर्ण कोर्ट कव्हर करण्यावर आधारित आहे.”

रूनला पुनरागमनानंतर काही सामने गमवावे लागू शकतात, मात्र त्याला पुन्हा कोर्टवर पाहून आनंद झाला असल्याचे अल्काराजने सांगितले.

“मी त्याच्यासोबत मर्सियामध्ये एका आठवड्याचा सराव केला. त्यावेळी तो चांगला खेळताना दिसला. आता त्याला सामन्यांच्या लयीत येण्याची गरज आहे. त्याने संयम ठेवायला हवा. ही प्रक्रिया संथ असेल, पण तो नक्कीच आपल्या इच्छित स्तरावर पोहोचेल,” असा विश्वास अल्काराजने व्यक्त केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा