30.5 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरस्पोर्ट्सगोल्डवर भारताची मोहोर! ऑलिम्पिकचे तिकीट पक्के

गोल्डवर भारताची मोहोर! ऑलिम्पिकचे तिकीट पक्के

Google News Follow

Related

भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन गेम्समध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले. गिफू प्रीफेक्चरल ग्रीन स्टेडियमवर शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने मलेशियाचा ५-१ असा धुव्वा उडवत विजेतेपदावर नाव कोरले. या विजयासह भारताने लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकचे तिकीटही निश्चित केले.

सामन्याच्या सुरुवातीपासून भारतीय संघाने आक्रमक खेळ करत मलेशियावर दबाव निर्माण केला. ११व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, १४व्या मिनिटाला मलेशियाच्या शैली सिल्व्हेरियसने फील्ड गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला.

यानंतर भारताने सामन्यावर पुन्हा वर्चस्व मिळवले. २३व्या मिनिटाला जुगराज सिंहने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताची आघाडी २-१ केली. मध्यंतरानंतर ४२व्या मिनिटाला हार्दिक सिंहने पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रूपांतर करत भारताला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली.

भारताचा धडाका यानंतरही कायम राहिला. ५४व्या मिनिटाला शिलानंद लाकडाने फील्ड गोल करत स्कोअर ४-१ केला. अखेर ५७व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंहने आणखी एक पेनल्टी कॉर्नर गोल करत भारताचा विजय ५-१ असा निश्चित केला.

भारताचे सुवर्णपदकाचे यश

या विजयासह भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन गेम्सच्या इतिहासात पहिल्यांदाच आपल्या सुवर्णपदकाचा यशस्वी बचाव केला. भारताने यापूर्वी १९६६, १९९८, २०१४ आणि २०२२ मध्ये एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. २०२६ चे सुवर्णपदक हे भारताचे एशियन गेम्समधील पुरुष हॉकीचे पाचवे सुवर्णपदक ठरले.

विशेष म्हणजे, यंदाच्या एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांनीही सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक ‘गोल्डन डबल’ साधले. शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघाने चीनचा १-० असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते. या विजयासह महिला संघानेही २०२८ ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. १९८२ नंतर प्रथमच भारतीय महिला हॉकी संघाने एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले.

एशियन गेम्समध्ये कबड्डी आणि क्रिकेटनंतर पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी करणारा भारताचा हॉकी संघ हा तिसरा भारतीय संघ ठरला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा