37 C
Mumbai
Friday, October 9, 2026
घरस्पोर्ट्सचाइना मास्टर्समध्ये श्रीकांतचा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

चाइना मास्टर्समध्ये श्रीकांतचा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

Google News Follow

Related

भारताचा माजी जागतिक क्रमवारीतील नंबर-१ बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने चायना मास्टर्स सुपर ७५० स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत (क्वार्टर फायनल) प्रवेश केला आहे. श्रीकांतने जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा सरळ दोन गेममध्ये पराभव केला.

शेन्झेन एरिनामध्ये झालेल्या सामन्यात श्रीकांतने व्हिक्टर लाईवर २१-१८, २१-१९ असा विजय मिळवला. गेल्या दोन बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या व्हिक्टरविरुद्ध श्रीकांतने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला.

स्पर्धेच्या पहिल्या फेरीतही श्रीकांतने दमदार कामगिरी केली होती. त्याने चायनीज तैपेईच्या जागतिक क्रमवारीत २१व्या स्थानावर असलेल्या ची यू-जेनचा अवघ्या ३५ मिनिटांत २१-१६, २१-१५ असा पराभव केला होता.

आता श्रीकांतचा सामना हाँगकाँगच्या ली चेउक यियू याच्याशी होणार आहे. लीने उपउपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीतील नवव्या क्रमांकाच्या टोमा पोपोव्हचा पराभव केला आहे.

या मोसमातील श्रीकांतची दुसरी क्वार्टर फायनल

श्रीकांतसाठी या मोसमातील ही दुसरी उपांत्यपूर्व फेरी आहे. यापूर्वी जून महिन्यात झालेल्या यूएस ओपनमध्ये त्याने अंतिम फेरीपर्यंत मजल मारत उपविजेतेपद मिळवले होते.

महिला एकेरीतील भारताचे आव्हान संपले

दरम्यान, भारताच्या तन्वी शर्माला टोमोका मियाझाकीकडून १७-२१, २१-१८, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे चायना मास्टर्सच्या महिला एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले.

महिला एकेरीत यापूर्वी देविका सिहागलाही बल्गेरियाच्या कालोयाना नलबांतोव्हाकडून १८-२१, १५-२१ असा पराभव स्वीकारावा लागला होता.

सात्त्विक-चिरागकडून दमदार सुरुवात

पुरुष दुहेरीत भारताची स्टार जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी विजयी सुरुवात केली. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या भारतीय जोडीने मलेशियाच्या जुनैदी आरिफ आणि कांग खाई जिंग यांचा अवघ्या ४० मिनिटांत २१-११, २१-१६ असा पराभव केला.

आता त्यांचा सामना फ्रान्सच्या क्रिस्टो पोपोव्ह आणि टोमा ज्युनियर पोपोव्ह यांच्याशी होणार आहे.

मिक्स्ड डबल्समध्ये ध्रुव कपिला-तनिषा क्रॅस्टो यांना तैवानच्या लियू कुआंग हेंग आणि सू यिन-हुई यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. तसेच रोहन कपूर-रुथविका शिवानी गड्डे यांचेही आव्हान संपले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा