31 C
Mumbai
Sunday, March 15, 2026
घरस्पोर्ट्सद्रविड, बिन्नी आणि मिताली यांना लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार

द्रविड, बिन्नी आणि मिताली यांना लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार

Google News Follow

Related

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) १५ मार्च रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या बीसीसीआय नमन अवॉर्ड्स २०२६ सोहळ्यात भारतीय क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणार आहे. हा वार्षिक सोहळा आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि वयोगटातील क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करतो. तसेच भारतीय क्रिकेटच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींनाही गौरवण्यात येते.

यंदा १९८३ विश्वचषक विजेता संघातील ऑलराउंडर रॉजर बिन्नी आणि भारताला टी२० विश्वचषक २०२४ जिंकून देणारे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना भारतीय क्रिकेटमधील दीर्घ आणि मोलाच्या सेवेसाठी कर्नल सी. के. नायडू लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार देण्यात येणार आहे.

तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज हिला देशातील महिला क्रिकेटच्या प्रगतीत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल बीसीसीआय लाइफटाइम अचीवमेंट पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

रॉजर बिन्नी यांनी १९८३ च्या ऐतिहासिक विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या स्पर्धेत ते सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज ठरले होते. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर त्यांनी प्रशिक्षक, निवड समिती सदस्य आणि बीसीसीआय अध्यक्ष म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

दरम्यान, राहुल द्रविड यांना त्यांच्या भव्य क्रिकेट कारकिर्दीसाठी आणि २४,००० हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्याबद्दल तसेच मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणून दिलेल्या योगदानासाठी हा सन्मान दिला जात आहे.

भारताचा कसोटी आणि वनडे कर्णधार शुभमन गिल याला २०२४-२५ हंगामासाठी पॉली उमरीगर पुरस्कार (सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटर) मिळणार आहे.

तर स्मृती मंधाना हिला पाचव्यांदा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटर पुरस्कार मिळणार आहे.

याशिवाय महिला संघाची सलामीवीर शेफाली वर्मा आणि नुकत्याच अंडर-१९ विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.

देशांतर्गत स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशनला विशेष सन्मान दिला जाणार आहे.

या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे अलीकडे आयसीसी स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या पाच भारतीय संघांचा गौरव केला जाणार आहे. यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५, टी२० विश्वचषक २०२६, महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ तसेच पुरुष आणि महिला अंडर-१९ विश्वचषक विजेते संघ यांचा समावेश आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा