30.2 C
Mumbai
Thursday, April 16, 2026
घरस्पोर्ट्सधक्का बसला जगाला! पाकिस्तानची पुन्हा नाचक्की

धक्का बसला जगाला! पाकिस्तानची पुन्हा नाचक्की

Google News Follow

Related

पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा पुन्हा एकदा मातीमोल झाल्याचं चित्र समोर आलं आहे. पाकिस्तानचा स्टार फलंदाज फखर झमान याच्यावर बॉल टॅम्परिंगचा आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला पीएसएल २०२६ मधील २ सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) ही माहिती अधिकृतपणे जाहीर केली.

२९ मार्च रोजी गद्दाफी स्टेडियमवर लाहोर कलंदर्स आणि कराची किंग्स यांच्यात सामना रंगला होता. कराचीला शेवटच्या ६ चेंडूंमध्ये १४ धावांची गरज होती. अंतिम षटक सुरू होण्यापूर्वी लाहोरचा कर्णधार शाहीन आफ्रिदी, हारिस रऊफ आणि फखर झमान एकत्र चर्चा करत होते. त्याचवेळी फखर झमान चेंडू खुरचताना दिसला आणि पंचांच्या नजरेत ही बाब आली.

मैदानावरील पंचांनी तपास करून चेंडूशी छेडछाड झाल्याचं स्पष्ट केलं. परिणामी लाहोर कलंदर्सवर ५ धावांची पेनल्टी ठोठावण्यात आली आणि जुना चेंडू बदलून नवा चेंडू देण्यात आला. या निर्णयाने सामन्याचं चित्रच बदललं. आता कराचीला ६ चेंडूंमध्ये फक्त ९ धावा हव्या राहिल्या. अब्बास आफ्रिदीने चौकार आणि षटकार ठोकत कराची किंग्सला ४ विकेट्सनी विजय मिळवून दिला.

फखर झमानवर पीएसएलच्या आचारसंहितेतील आर्टिकल २.१४ (चेंडूची स्थिती बदलणे) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हा लेव्हल-३ गुन्हा मानला जातो. फखरने आरोप नाकारत निर्णयाला आव्हान दिलं होतं, मात्र मॅच रेफरी रोशन महानामा यांनी सर्व पुरावे तपासून २ सामन्यांची बंदी कायम ठेवली.

या बंदीमुळे फखर झमान ३ एप्रिलला मुल्तान सुल्तान्सविरुद्ध आणि ९ एप्रिलला इस्लामाबाद युनायटेडविरुद्ध होणारे सामने खेळू शकणार नाही.

या घटनेमुळे पाकिस्तान क्रिकेट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं असून क्रिकेटविश्वात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा