32 C
Mumbai
Friday, October 9, 2026
घरस्पोर्ट्सशेफालीला पॅव्हेलियनचा इशारा फातिमाला महागात

शेफालीला पॅव्हेलियनचा इशारा फातिमाला महागात

Google News Follow

Related

भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानी कर्णधार फातिमा सना हिला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारताची सलामीवीर शेफाली वर्माला बाद केल्यानंतर पॅव्हेलियनकडे इशारा करणं फातिमाला चांगलंच महागात पडलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICCने तिच्यावर मॅच फीच्या १० टक्के दंडाची कारवाई केली असून, खात्यात एक डिमेरिट पॉइंटही जोडला आहे.

भारताच्या डावातील दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ही घटना घडली. फातिमा सनाने शेफाली वर्माला कॉट-अँड-बोल्ड करत तिच्याकडे पाहत पॅव्हेलियनच्या दिशेने इशारा केला. ICCच्या मते हा प्रकार खेळाडूला भडकवणाऱ्या किंवा आक्षेपार्ह कृतीच्या श्रेणीत येतो.

या प्रकरणात फातिमावर ICC आचारसंहितेच्या आर्टिकल २.५ अंतर्गत कारवाई करण्यात आली. या नियमानुसार, फलंदाज बाद झाल्यानंतर त्याच्याविरोधात आक्रमक प्रतिक्रिया निर्माण करू शकतील अशा भाषा, कृती किंवा इशाऱ्यांचा वापर करणे नियमभंग ठरतो.

विशेष म्हणजे, २४ महिन्यांतील हा फातिमाचा दुसरा नियमभंग आहे. त्यामुळे तिच्या खात्यातील एकूण डिमेरिट पॉइंट्सची संख्या आता दोन झाली आहे. यापूर्वी ६ ऑगस्ट २०२५ रोजी डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात तिला एक डिमेरिट पॉइंट मिळाला होता.

मैदानावरील पंच निमाली परेरा आणि शथिरा जाकिर जेसी, तिसरे पंच रुकैया सुल्ताना आणि चौथे पंच रबाब अहसान यांनी फातिमाविरोधात आरोप नोंदवले होते.

फातिमाने आपली चूक मान्य केली आणि ICC मॅच रेफरी सुप्रिया राणी दास यांनी सुचवलेली शिक्षा स्वीकारली. त्यामुळे या प्रकरणात औपचारिक सुनावणी घेण्याची गरज पडली नाही.

दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानचा संघ फलंदाजीत सपशेल अपयशी ठरला. पाकिस्तानचा डाव अवघ्या ५५ धावांत आटोपला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने केवळ ८.४ षटकांत ३ विकेट्स गमावून लक्ष्य गाठत ७ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा