29.4 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरस्पोर्ट्सएम्बाप्पेचा सुवर्ण वार! फ्रान्सची क्वार्टर फायनलमध्ये दिमाखदार एन्ट्री

एम्बाप्पेचा सुवर्ण वार! फ्रान्सची क्वार्टर फायनलमध्ये दिमाखदार एन्ट्री

Google News Follow

फिफा विश्वचषक २०२६ च्या प्री-क्वार्टर फेरीत किलियन एम्बाप्पे याच्या निर्णायक गोलच्या जोरावर फ्रान्सने पॅराग्वेचा १-० असा पराभव करत उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) फेरीत दिमाखात प्रवेश केला. या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या एम्बाप्पेने पुन्हा एकदा मोठ्या सामन्यात आपली छाप सोडली.

सामन्याच्या ६९व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी मिळाली. डिझायर डुए याला पेनल्टी बॉक्समध्ये पाडल्यानंतर मिळालेल्या या संधीचे सोनं करत एम्बाप्पेने अचूक फटका मारत चेंडू जाळ्यात धाडला आणि फ्रान्सला निर्णायक आघाडी मिळवून दिली.

या विश्वचषकातील एम्बाप्पेचा हा सातवा गोल असून, त्यामुळे तो गोल्डन बूट शर्यतीतील प्रमुख दावेदार बनला आहे. विशेष म्हणजे, विश्वचषकाच्या बाद फेरीतील त्याचा हा ११वा गोल ठरला. तसेच सलग तीन विश्वचषकांतील राऊंड ऑफ १६ सामन्यांत गोल करणारा तो पहिलाच फुटबॉलपटू ठरला.

पॅराग्वेने संपूर्ण सामन्यात शिस्तबद्ध बचाव करत फ्रान्सला सहज गोल करू दिला नाही. पहिल्या सत्रात फ्रान्सचा चेंडूवरील ताबा अधिक होता, मात्र पॅराग्वेचा गोलरक्षक ऑर्लॅंडो गिल याने अनेक धोकादायक प्रयत्न हाणून पाडले.

दुसऱ्या सत्रात फ्रान्सने आक्रमणाची धार वाढवली. उस्मान डेम्बेले आणि मनू कोने यांच्या प्रयत्नांनाही यश आले नाही. मात्र अखेर एम्बाप्पेच्या पेनल्टी गोलने सामना फ्रान्सच्या बाजूने झुकला आणि अखेरपर्यंत ती आघाडी कायम राखत फ्रान्सने १-० असा विजय मिळवला.

आता उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्ससमोर मोरक्कोचे आव्हान असणार आहे. मोरक्कोने प्री-क्वार्टर फेरीत कॅनडाचा ३-० असा पराभव करून शेवटच्या आठमध्ये प्रवेश केला आहे.

सामन्यानंतर एम्बाप्पे म्हणाला, “हा सामना कठीण असेल याची आम्हाला कल्पना होती. आम्ही केवळ आक्रमक फुटबॉलच खेळत नाही, तर कठीण परिस्थितीतही संघ म्हणून लढू शकतो, हे आज सिद्ध झाले. आता आमचे पूर्ण लक्ष मोरक्कोविरुद्धच्या सामन्यावर आहे.”

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा