29.6 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरस्पोर्ट्सफ्रान्सची विजयी घोडदौड; सेमीफायनल गाठले

फ्रान्सची विजयी घोडदौड; सेमीफायनल गाठले

Google News Follow

फ्रान्सने फिफा विश्वचषक २०२६ फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीतील एकतर्फी सामन्यात फ्रान्सने मोरोक्कोचा २-० असा पराभव करत सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. या पराभवासह मोरोक्कोचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच फ्रान्सने आक्रमक खेळ करत मोरोक्कोच्या बचावफळीवर सातत्याने दबाव निर्माण केला. सामन्याच्या ५व्या मिनिटाला मोरोक्कोचा गोलरक्षक यासीन बुनू याने दायोट उपामेकानोचा हेडर अप्रतिमरीत्या रोखत संघाला मोठा दिलासा दिला.

यानंतर नोसैर मजराउई याने किलियन एम्बाप्पेवर बॉक्समध्ये फाऊल केल्याने फ्रान्सला पेनल्टी मिळाली. मात्र, एम्बाप्पेला त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. बुनूने उत्कृष्ट बचाव करत मोरोक्कोला सामन्यात कायम ठेवले. पहिल्या सत्रात फ्रान्सने अनेक संधी निर्माण केल्या, पण मोरोक्कोचा बचाव भेदता आला नाही. त्यामुळे मध्यंतरापर्यंत सामना ०-० असा बरोबरीत राहिला.

दुसऱ्या सत्रात मात्र फ्रान्सने गती वाढवली. ६०व्या मिनिटाला कर्णधार किलियन एम्बाप्पे याने शानदार कर्लिंग शॉटद्वारे गोल करत फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या विश्वचषकातील त्याचा हा आठवा गोल ठरला.

याच्या अवघ्या सहा मिनिटांनंतर, एम्बाप्पेच्या अचूक पासवर उस्मान डेम्बेले याने गोल करत फ्रान्सची आघाडी २-० अशी भक्कम केली. त्यानंतर फ्रान्सने संपूर्ण सामन्यावर नियंत्रण राखत मोरोक्कोला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही.

या विजयासह फ्रान्सने सलग तिसऱ्यांदा फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. २०१८ मध्ये फ्रान्सने विश्वचषक जिंकला होता, तर २०२२ मध्ये अंतिम फेरी गाठली होती. आता १५ जुलै रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सचे पुढील आव्हान असेल.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा