जर्मनीने रचला इतिहास, फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा संघ

जर्मनीने रचला इतिहास, फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा संघ

फिफा विश्वचषक फुटबॉल २०२६ मध्ये जर्मनीने कुराकाओचा ७-१ अशा मोठ्या फरकाने पराभव करत स्पर्धेची दमदार सुरुवात केली. या शानदार कामगिरीसह जर्मनीने इतिहास रचला आहे. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा संघ म्हणून जर्मनीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

जर्मनीने कुराकाओविरुद्धच्या सामन्यात सातवा गोल करत ही ऐतिहासिक कामगिरी केली. आता फिफा विश्वचषकात जर्मनीच्या नावावर एकूण २३९ गोल जमा झाले आहेत. या बाबतीत त्यांनी पाच वेळा विश्वविजेता ठरलेल्या ब्राझील संघाला मागे टाकले आहे. ब्राझीलने विश्वचषकात आतापर्यंत २३८ गोल केले आहेत.

तर गतविजेता अर्जेंटिना संघ १५२ गोलसह तिसऱ्या स्थानावर आहे. फ्रान्स संघ १३६ गोलसह चौथ्या स्थानावर आहे तर इटली १२८ गोलसह पाचव्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा:

मदरशातील शिक्षकासोबत लग्न ठरल्याने मुलीने संपवले जीवन

फाल्टाचा ‘पुष्पा’ झुकला! जहांगीर खानची पुन्हा काढली धिंड

अमेरिका-इराण शांतता कराराचे पंतप्रधान मोदींकडून स्वागत

अमेरिका- इराण शांतता करार पूर्ण! होर्मुझ सामुद्रधुनी आता खुली

कुराकाओविरुद्धच्या सामन्यात अवघ्या सहाव्या मिनिटालाच जर्मनीने पहिला गोल करत आपले इरादे स्पष्ट केले. मात्र, कुराकाओने सर्वांना आश्चर्यचकित करत लवकरच स्कोअर १-१ असा बरोबरीत आणला.

यानंतर जर्मनीने गोलांचा पाऊस पाडला. निको श्लॉटरबेक याने कॉर्नर किकवर शानदार हेडर मारत जर्मनीला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्राच्या अतिरिक्त वेळेत काई हॅवर्ट्झ याने मिळालेल्या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करत जर्मनीची आघाडी ३-१ अशी केली.

दुसऱ्या सत्रात जर्मनीचा आक्रमक खेळ आणखी तीव्र झाला. खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या ६९ सेकंदांत जमाल मुसियाला  याने शानदार गोल करत संघाचा चौथा गोल नोंदवला. कुराकाओचा बचाव जर्मनीच्या स्टार खेळाडूंसमोर पूर्णपणे हतबल दिसला. विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या नॅथनील ब्राऊन याने सुंदर गोल करत स्कोअर ५-१ असा केला.

थोड्याच वेळात डेनिझ उन्दाव याने जर्मनीसाठी सहावा गोल केला तर सामना संपण्यापूर्वी पुन्हा एकदा काई हॅवर्ट्झ याने सातवा गोल करत जर्मनीच्या संस्मरणीय विजयावर शिक्कामोर्तब केले.

 सर्वाधिक गोल करणारे देश

जर्मनी- २३९

ब्राझील – २३८

अर्जेंटिना – १५२

फ्रान्स – १३६

इटली – १२८

Exit mobile version