26 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरस्पोर्ट्समुंबईच्या तोंडातला घास गुजरातने हिसकावला!

मुंबईच्या तोंडातला घास गुजरातने हिसकावला!

Google News Follow

Related

वानखेडे स्टेडियम, पावसाने चिंब, वातावरणात तणाव आणि श्वास रोखून टाकणारा क्षण! आणि त्याचवेळी, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर थरारक विजय मिळवत चाहत्यांच्या हृदयात पुन्हा एकदा आपली जागा पक्की केली.

सामना सुरु झाला तेव्हा मुंबई इंडियन्सने केवळ 155/8 धावा केल्या. गुजरातच्या गोलंदाजांनी चोख कामगिरी केली. आणि जेव्हा गुजरातची फलंदाजी सुरू झाली, तेव्हा 14 ओव्हरमध्ये 107/2 अशी मजबूत स्थिती होती. पण… नशीबाला काही वेगळंच मंजूर होतं!

पावसाने सामन्याला खंडित केलं. पुन्हा खेळ सुरू झाला, आणि जसप्रीत बुमराहने गिलचा बळी घेताच सामना एका नव्या वळणावर गेला. शाहरुख खानही बाद झाला. गुजरातची अवस्था 132/6. परत पाऊस! डगआउटमध्ये प्रचंड निराशा… पण अजूनही सामना बाकी होता!

शेवटची एक ओव्हर – 15 धावांची गरज! मैदानात भावनांचं वादळ, डगआउटमध्ये नाखुशी आणि चाहत्यांच्या नजरा एकाच ठिकाणी खिळलेल्या. आणि मग… राहुल तेवतियाचा चौकार! गेराल्ड कोएट्झीचा षटकार! दीपक चाहरची नो बॉल! आणि अखेर… विजय!!

गिल म्हणतो, “अशा प्रकारची जिंकलेली सामने तुमचा आत्मविश्वास जबरदस्त वाढवतात. जेव्हा सर्वकाही तुमच्या विरोधात जातं, तेव्हा अशा विजयात खरी मजा आहे.

पावसामुळे झालेले व्यत्यय, डगआउटमधल्या नकारात्मक भावना आणि सामना गमावण्याची भीती… या सगळ्यावर मात करत गुजरातने शेवटच्या क्षणाला विजय खेचून आणला.

गिल पुढे म्हणतो, “आपण प्लेऑफमध्ये पोहोचल्याचं अजून म्हणणार नाही, पण प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम द्यायचं, हेच आमचं ध्येय आहे.

राशिद खानच्या पुनरागमनानेही गिल खूप उत्साही आहे. “चोटीनंतर परत येणं सोपं नसतं. पण राशिदने ज्या जिद्दीने खेळ केलं, ते आम्हाला पुढे आश्वासक ठरतं.

हा सामना केवळ आकड्यांचा नव्हता – हा सामना होता जिद्दीचा, संयमाचा, आणि त्या ‘शेवटच्या संधी’चा – जी गुजरातने पूर्ण ताकदीने स्वीकारली!

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा