28.2 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरस्पोर्ट्स“मृत्यूशी झुंज जिंकली… आणि परत आलो!”

“मृत्यूशी झुंज जिंकली… आणि परत आलो!”

Google News Follow

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी फलंदाज डेमियन मार्टिन आता पूर्णपणे ठणठणीत झाला आहे. गंभीर आजारातून बाहेर पडल्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत, आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले आहेत.

डेमियन मार्टिनने ‘एक्स’वर लिहिलं आहे की, “ही पोस्ट माझ्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि त्या सगळ्यांसाठी आहे ज्यांनी या कठीण काळात माझ्याशी संपर्क साधला. २७ डिसेंबर २०२५ रोजी मेंदूवर मेनिनजाइटिसचा गंभीर परिणाम झाला आणि मला कळण्याआधीच डॉक्टरांनी मला तब्बल ८ दिवस पॅरालाइज्ड कोमामध्ये ठेवलं होतं. तेव्हा जिवंत राहण्याची शक्यता फक्त ५०-५० होती.”

तो पुढे म्हणतो, “८ दिवसांनी मी कोमामधून बाहेर आलो. तेव्हा ना चालता येत होतं, ना बोलता. पण त्यानंतर फक्त चार दिवसांतच मी चालू लागलो, बोलू लागलो आणि डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का दिला. मी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळवून रिकव्हरी सुरू करू शकतो, हे मी त्यांना दाखवून दिलं.”

घरात परतल्यानंतरचा अनुभव सांगताना मार्टिन म्हणतो, “घरी आल्यावर बीचवर जाऊन वाळूत पाय ठेवले, तेव्हा खूप आनंद झाला. या सगळ्या काळात माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी ज्यांनी न थकता साथ दिली, त्या प्रत्येकाचे मनापासून आभार.”

या संपूर्ण अनुभवाबद्दल तो म्हणतो, “या सगळ्यामुळे आयुष्य किती नाजूक आहे, क्षणात सगळं कसं बदलू शकतं आणि वेळ किती मौल्यवान आहे, हे पुन्हा एकदा कळलं. या जगात खूप चांगली माणसं आहेत — पॅरामेडिक्स, डॉक्टर, नर्सेस (गोल्ड कोस्ट युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधल्या), कुटुंबीय, मित्र आणि अगदी मला न ओळखणारे लोकसुद्धा. गेल्या तीन आठवड्यांत या सगळ्यांकडून मला प्रेम आणि आधार मिळाला.”

हेही वाचा :

इंदौरमध्ये विराटचा विक्रमाचा डाव?

पीएमसीच्या पोर्टलवर नावांचा गोंधळ!

राज ठाकरेंचा फायदा इतरांना, पण मनसेची झोळी रिकामीच

महानगरपालिका निवडणुकीतील अपयशावर राज ठाकरे काय म्हणाले?

पोस्टच्या शेवटी तो लिहितो, “मी तुमचा कायम ऋणी आहे. धन्यवाद. २०२६, येत आहे… मी परत आलोय!”

उल्लेखनीय म्हणजे, डेमियन मार्टिन २००३ साली ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या एकदिवसीय संघाचा भाग होता. त्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने नाबाद ८८ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा