29.9 C
Mumbai
Sunday, November 8, 2026
घरस्पोर्ट्स२०२७ च्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे २० शिलेदार शॉर्टलिस्ट!

२०२७ च्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे २० शिलेदार शॉर्टलिस्ट!

जुन्या दिग्गजांसह नव्या चेहऱ्यांना संधी

Google News Follow

टीम इंडियाचा गेल्या काही वर्षात कामगिरीचा आलेख हा चढता राहिला आहे. अपवाद वगळता टीम इंडियाने द्विपक्षीय मालिका, मल्टी नॅशनल आणि आयसीसी स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन दाखवली आहे. आता २०२७ मध्ये वनडे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. टीम इंडियाचं २०२३ मध्ये वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. मात्र आता गतउपविजेता टीम इंडिया वर्ल्ड कप उंचावण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यानुसार टीम मॅनेजमेंटने हालचालींना सुरुवात केली आहे. या स्पर्धेसाठी टीम मॅनेजमेंटने २० खेळाडू निश्चित केल्याचं म्हटलं जात आहे.

दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांमध्ये २०२७ चा वनडे वर्ल्ड कप थरार रंगणार आहे. २ ऑक्टोबर २०२७ पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून, आता भारतीय संघाकडे तयारीसाठी एका वर्षापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. गेल्या वर्षभरात भारतीय संघ व्यवस्थापनाने अनेक नव्या खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. विशेषतः वेगवान गोलंदाजी विभागात आकिब नबी, प्रिन्स यादव आणि गुरनूर ब्रार यांसारख्या खेळाडूंना संधी देण्यात आली. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह, विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांसारख्या अनुभवी खेळाडूंची विश्वचषकातील जागा जवळपास निश्चित मानली जात आहे.

अशातच, विश्वचषकासाठी भारतीय संघाची संभाव्य शॉर्टलिस्ट तयार असल्याची चर्चा आहे. या खेळाडूंमधून अंतिम १५ जणांची निवड केली जाऊ शकते. यशस्वी जयस्वाल साठी मात्र विश्वचषकाचे दरवाजे बंद होण्याची शक्यता आहे. निवड समितीने सध्या त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये फारशा संधी दिलेल्या नाहीत. त्यामुळे त्याचा मुख्य संघासह राखीव खेळाडूंमध्येही समावेश होण्याची शक्यता कमी आहे.

हे ही वाचा:

कुख्यात गँगस्टर गुरविंदर इथिओपियातून भारतात प्रत्यार्पित

इस्रायलमध्ये गादी आयझेनकोट यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण

रामायण: पार्ट वन’ची तिसऱ्या दिवशी ६९.८० कोटींची कमाई

चीनचा धोका म्हणूनच सियांग धरणाचे धोरण

दुसरीकडे, ऋतुराज गायकवाडच्या नावाचा विचार होऊ शकतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या संघातही त्याला स्थान देण्यात आले होते. ऋतुराजची जमेची बाजू म्हणजे तो सलामीला फलंदाजी करण्यासोबतच गरज पडल्यास पाचव्या क्रमांकावरही खेळू शकतो. श्रेयस अय्यरचे चौथ्या क्रमांकावरील स्थान जवळपास निश्चित आहे. तर नमन धीरने मधल्या आणि खालच्या फळीत आक्रमक फलंदाजी करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. फलंदाजीसोबतच गरज पडल्यास तो गोलंदाजीची जबाबदारीही सांभाळू शकतो.

निश्चित केलेले २० खेळाडू :
शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, नमन धीर, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार, आकिब नबी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, इशान किशन.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा