28.2 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरस्पोर्ट्सलंकेची लाज काढली, आता पाकड्यांना लोळवायची पाळी!

लंकेची लाज काढली, आता पाकड्यांना लोळवायची पाळी!

Google News Follow

Related

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेचा तब्बल १२४ धावांनी धुव्वा उडवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा डाव अवघ्या ४५ धावांत आटोपला. श्रीलंकेचा संघ ९.५ षटकांतच गारद झाला. आता अंतिम सामन्यात ३ ऑक्टोबर रोजी भारताची गाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी पडणार आहे.

भारताच्या या विजयात फलंदाज ईशान किशन आणि गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. ईशानने नाबाद ८० धावांची शानदार खेळी करत भारतीय संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेत श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

ईशान किशनची फटकेबाजी; भारताची १६९ धावांची मजल

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर अभिषेक शर्मा अवघ्या ७ धावा करून माघारी परतला. संजू सॅमसनलाही ९ चेंडूंत केवळ ७ धावा करता आल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने १३ धावांचे योगदान दिले. त्यामुळे सुरुवातीच्या षटकांत भारताची फलंदाजी काहीशी अडचणीत आली होती.

मात्र, वैभव सूर्यवंशीने आक्रमक फलंदाजी करत डावाला गती दिली. त्याने २१ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३८ धावा फटकावल्या. त्याच्या खेळीमुळे भारतीय संघाला वेगाने धावा जमवण्यास मदत झाली.

दुसऱ्या बाजूने भारतीय फलंदाज बाद होत असताना ईशान किशनने मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही फटकेबाजी सुरू ठेवत ४६ चेंडूंत नाबाद ८० धावा केल्या. त्याच्या खेळीत ४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता.

अक्षर पटेलने ८ धावा केल्या. तिलक वर्मा २, तर शिवम दुबे ३ धावांवर बाद झाले. त्यामुळे भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १६९ धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेकडून थारिंदू रथनायके आणि कर्णधार सहान अराचिगे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली; ४५ धावांत संपूर्ण संघ बाद

१७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. सिनेत जयवर्धने, लसित क्रुसपुले आणि सोहन डी लिवेरा यांना खातेही उघडता आले नाही. सुरुवातीलाच तीन फलंदाज शून्यावर बाद झाल्याने श्रीलंकेचा संघ प्रचंड दबावाखाली आला.

नुवानिदू फर्नांडोने ११ चेंडूंत १५ धावा करत काहीसा प्रतिकार केला. कर्णधार सहान अराचिगेने ८ चेंडूंत ९ धावा केल्या. मात्र, अन्य फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव धरता आला नाही. एशेन बंडारा शून्यावर बाद झाला, तर वानुजा सहनला केवळ १ धाव करता आली.

भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, तर वॉशिंग्टन सुंदरने १ बळी मिळवला. श्रीलंकेचे सहा फलंदाज खाते न उघडताच माघारी परतले. अखेर संपूर्ण संघ ९.५ षटकांत अवघ्या ४५ धावांत बाद झाला.

अंतिम फेरीत भारत-पाकिस्तान महामुकाबला

श्रीलंकेवर मिळवलेल्या या मोठ्या विजयामुळे भारतीय संघाने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे. आता ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना सुवर्णपदकासाठी रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे, पराभूत श्रीलंकेचा संघ कांस्यपदकाच्या सामन्यात बांगलादेशशी भिडणार आहे.

भारताची नजर आता पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून सुवर्णपदकावर मोहोर उमटवण्याकडे लागली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा