29 C
Mumbai
Wednesday, October 7, 2026
घरस्पोर्ट्सदक्षिण कोरियाला ५-१ ने लोळवत भारताची फायनलमध्ये दिमाखात एंट्री

दक्षिण कोरियाला ५-१ ने लोळवत भारताची फायनलमध्ये दिमाखात एंट्री

Google News Follow

Related

विद्यमान विजेत्या भारताने एएचएफ ज्युनियर महिला आशिया कप २०२६च्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत दक्षिण कोरियाचा ५-१ असा एकतर्फी पराभव केला.

भारताच्या विजयात सुप्रियाची हॅट्ट्रिक विशेष ठरली. ड्रॅग-फ्लिकमध्ये तरबेज असलेल्या सुप्रियाने पेनल्टी कॉर्नरवर तब्बल तीन गोल करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

भारताने सुरुवातीला सावध खेळ करत हळूहळू सामन्यावर पकड मिळवली. १३व्या मिनिटाला मधु सिदारने शानदार आक्रमण पूर्ण करत भारताचे खाते उघडले आणि संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमणाचा वेग वाढवला. १७व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर सुप्रियाने अचूक ड्रॅग-फ्लिक करत भारताची आघाडी २-० केली.

यानंतर भारतीय संघाने दक्षिण कोरियावर सातत्याने दबाव कायम ठेवला. २१व्या मिनिटाला सुखवीर कौरने शानदार फिनिशिंग करत भारतासाठी तिसरा गोल केला. त्यामुळे मध्यंतरापर्यंत भारताने ३-० अशी भक्कम आघाडी घेतली.

उत्तरार्धातही भारताचा आक्रमक खेळ कायम राहिला. ३३व्या मिनिटाला सुप्रियाने पुन्हा पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत आपला दुसरा गोल नोंदवला आणि भारताला ४-० अशी आघाडी मिळवून दिली.

दक्षिण कोरियाने ४१व्या मिनिटाला युरी जियोंगच्या सेट-पीसवरील गोलच्या जोरावर पिछाडी ४-१ अशी कमी केली. मात्र, भारतीय खेळाडूंनी त्यानंतर बचाव अधिक मजबूत करत सामन्यावरील नियंत्रण कायम ठेवले.

सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात ५६व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर सुप्रियाने पुन्हा गोल करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. तिच्या तिसऱ्या गोलमुळे भारताने ५-१ असा शानदार विजय मिळवत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

आता अंतिम सामन्यात भारताचा सामना चीन आणि जपान यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्याच्या विजेत्याशी होणार आहे. विद्यमान विजेतेपद कायम राखण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा