27 C
Mumbai
Friday, February 27, 2026
घरस्पोर्ट्सभारत–न्यूझीलंड पहिली वनडे : हेड-टू-हेडमध्ये कोणाचा वरचष्मा?

भारत–न्यूझीलंड पहिली वनडे : हेड-टू-हेडमध्ये कोणाचा वरचष्मा?

Google News Follow

Related

टी२० विश्वचषक २०२६ पूर्वी भारतीय संघ आपली अखेरची मोठी तयारी म्हणून न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडचा संघ तीन वनडे आणि पाच टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात दाखल झाला आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी वडोदऱ्यातील बडोदा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मालिकेची सुरुवात विजयाने करण्याचा भारताचा निर्धार असेल.

दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकलेले कर्णधार शुभमन गिल पुन्हा संघात परतत आहेत. त्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी हा सामना अधिकच उत्सुकतेचा ठरणार आहे. मैदानावर पुन्हा एकदा ‘रो-को’ म्हणजेच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची जोडी पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मागील वनडे मालिकांमध्ये दोघांचाही कामगिरी दमदार होती. त्यामुळे वडोदऱ्यातील सामन्यातही त्यांच्याकडून मोठ्या खेळींची अपेक्षा आहे. याशिवाय श्रेयस अय्यर याला अंतिम संघात संधी मिळते का, याकडेही लक्ष लागले आहे.

गुजरातमधील वडोदरा शहराच्या बाहेर कोटंबी येथे असलेल्या स्टेडियमवर आतापर्यंत केवळ प्रथम श्रेणी सामने झाले आहेत. येथे पहिल्यांदाच वनडे सामना खेळवला जाणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जात असून चेंडू सहजपणे बॅटवर येतो. त्यामुळे सामना उच्च धावसंख्येचा होण्याची शक्यता आहे. गोलंदाजांना सुरुवातीला फारशी मदत मिळणार नसली, तरी चेंडू जुना झाल्यावर फिरकीपटूंना थोडा फायदा होऊ शकतो. रविवारी वडोदऱ्यात कमाल तापमान सुमारे २९ अंश सेल्सियस तर किमान १४ अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे. नाणेफेक दुपारी १ वाजता, तर सामना १.३० वाजता सुरू होईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण १२० वनडे सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताचा वरचष्मा स्पष्ट दिसतो. भारताने ६२ सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने ५० सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला असून सात सामन्यांचा निकाल लागलेला नाही. विशेष म्हणजे मागील सहा वनडे सामन्यांत भारताने सलग विजय मिळवला आहे.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघात शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग आणि यशस्वी जयस्वाल यांचा समावेश आहे.

तर न्यूझीलंड संघाचे नेतृत्व मायकेल ब्रेसवेल करणार असून, संघात डेव्हॉन कॉनवे, विल यंग, हेन्री निकोल्स, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिच हे (यष्टीरक्षक), काइल जेमिसन यांसारखे अनुभवी खेळाडू आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा