29.5 C
Mumbai
Monday, November 9, 2026
घरस्पोर्ट्सभारताविरुद्ध फर्ग्युसन, टिकनर मालिकेबाहेर

भारताविरुद्ध फर्ग्युसन, टिकनर मालिकेबाहेर

Google News Follow

भारताविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडच्या अडचणी वाढल्या आहेत. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आणि ब्लेअर टिकनर दुखापतीमुळे मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांना मुकणार आहेत. त्यामुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजीची ताकद कमी झाली आहे.

न्यूझीलंड क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार, फर्ग्युसन टी-२० मालिकेदरम्यान झालेल्या उजव्या पायाच्या पोटरीच्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. तर वेलिंग्टन येथे झालेल्या वनडे सामन्यात हेल्मेटवर चेंडू लागल्याने टिकनरला दुखापत झाली होती. त्याची कनकशनची समस्या दूर झाली असली, तरी आयसीसीच्या नियमानुसार त्याला सात दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे तोही पुढील दोन सामने खेळू शकणार नाही.

अष्टपैलू गोलंदाज ख्रिश्चन क्लार्कला हॅमिल्टन येथे होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी टिकनरच्या पर्याय म्हणून संघात बोलावण्यात आले आहे. त्याला यापूर्वीच मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांसाठी संघात स्थान देण्यात आले होते. दरम्यान, चौथ्या वनडे सामन्यात मॅट हेन्रीचे पुनरागमन अपेक्षित आहे.

न्यूझीलंड क्रिकेटच्या माहितीनुसार, हेन्री आणि काइल जेमिसन हे तिसऱ्या वनडेनंतर वेलिंग्टन येथे कसोटी सराव शिबिरात सहभागी होणार होते. मात्र, आता ते चौथ्या वनडे सामन्यासाठीही संघासोबत थांबणार आहेत. टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स आणि नॅथन स्मिथ हे कसोटी मालिकेच्या तयारीसाठी तिसऱ्या वनडेनंतर बुधवारी वेलिंग्टनला रवाना होतील. कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

वनडे मालिकेत न्यूझीलंडला दुखापतींचा मोठा फटका बसला आहे. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे कनकशनमुळे, रचिन रवींद्र खांद्याच्या दुखापतीमुळे, तर मार्क चॅपमन हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले आहेत. याशिवाय वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीलाही दुखापतीमुळे आतापर्यंत मालिकेत खेळता आलेले नाही.

पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेत पुनरागमन करण्यासाठी न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

तिसऱ्या वनडेसाठी न्यूझीलंडचा संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ख्रिश्चन क्लार्क, जेकब डफी, मॅट फिशर, काइल जेमिसन, निक केली, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, टीम सायफर्ट, नॅथन स्मिथ, विल यंग.

चौथ्या वनडेसाठी न्यूझीलंडचा संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन अ‍ॅलन, मायकेल ब्रेसवेल, ख्रिश्चन क्लार्क, जेकब डफी, मॅट फिशर, डीन फॉक्सक्रॉफ्ट, मिचेल हे, मॅट हेन्री, काइल जेमिसन, निक केली, टीम सायफर्ट, विल यंग.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा