34 C
Mumbai
Wednesday, November 25, 2026
घरस्पोर्ट्सआयपीएलच्या लिलावात कोणाला मिळणार 'भाव'?

आयपीएलच्या लिलावात कोणाला मिळणार ‘भाव’?

Google News Follow

आयपीएल २०२७ च्या खेळाडूंच्या लिलावासाठी तब्बल १,२२० खेळाडूंनी नोंदणी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबत माहिती दिली. नोंदणी केलेल्या खेळाडूंमध्ये ९३९ भारतीय, तर १७ देशांतील २८१ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

आगामी हंगामाच्या लिलावापूर्वी दहा फ्रँचायझींनी मिळून १८४ खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे किंवा निवडले आहे. त्यामुळे लिलावात जास्तीत जास्त ६६ खेळाडूंचीच जागा उपलब्ध आहे. यामध्ये २५ परदेशी खेळाडूंचा समावेश असू शकतो.

नोंदणी केलेल्या खेळाडूंमध्ये १८४ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले (कॅप्ड), ९९४ अनकॅप्ड आणि सहयोगी देशांतील ४२ खेळाडूंचा समावेश आहे. अनकॅप्ड खेळाडूंमध्ये ९२५ भारतीय आहेत. यापैकी १२७ खेळाडू मागील आयपीएल हंगामात खेळले होते.

परदेशी खेळाडूंच्या नोंदणीत ऑस्ट्रेलिया ५३ खेळाडूंसह आघाडीवर आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिका (४०), वेस्ट इंडिज (३६), न्यूझीलंड (२५) आणि अफगाणिस्तान (२३) यांचा क्रमांक लागतो. सहयोगी देशांमध्ये अमेरिकेने १३, तर यूएई आणि नेपाळने प्रत्येकी १० खेळाडूंची नोंदणी केली आहे.

आता सर्व फ्रँचायझी नोंदणी यादीतून अंतिम लिलावासाठी खेळाडूंची नावे सुचवणार आहेत. खेळाडूंच्या अंतिम यादीसह त्यांचे गट ४ डिसेंबर रोजी जाहीर केले जातील.

आयपीएल २०२७ चा लिलाव १६ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोवा येथे पार पडणार आहे. खेळाडूंना कायम ठेवण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर होती. त्यापूर्वी अनेक मोठ्या खेळाडूंची संघांमध्ये अदलाबदल झाली. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून पंजाब किंग्जमध्ये, तर अर्शदीप सिंह पंजाब किंग्जमधून मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे.

याशिवाय हर्षल पटेल गुजरात टायटन्समध्ये, टी. नटराजन सनरायझर्स हैदराबादमध्ये, मोहम्मद शमी राजस्थान रॉयल्समध्ये, तर सॅम करन लखनौ सुपर जायंट्समध्ये दाखल झाले आहेत. ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्समध्ये, तर कुलदीप यादव लखनौ सुपर जायंट्समध्ये गेला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा