28 C
Mumbai
Tuesday, August 4, 2026
घरस्पोर्ट्सबुमराह बाहेर, आकिब नबीची संघात एंट्री

बुमराह बाहेर, आकिब नबीची संघात एंट्री

श्रीलंका कसोटी मालिकेसाठी भारताचा मोठा निर्णय

Google News Follow

Related

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीतून पूर्णपणे सावरू न शकल्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला मुकणार आहे. त्याच्या जागी जम्मू-काश्मीरचा युवा वेगवान गोलंदाज आकिब नबी याची प्रथमच भारतीय कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘एक्स’वरील पोस्टद्वारे ही माहिती दिली. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान बुमराहच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. नियोजित वेळेत तो पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्याने त्याला श्रीलंका दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. बुमराहचा संघाबाहेर होणे हा भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

बुमराहच्या जागी संधी मिळालेल्या आकिब नबीने गेल्या काही हंगामांमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत जम्मू-काश्मीरला विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. या स्पर्धेत त्याने ६० विकेट्स घेतल्या, तर मागील दोन रणजी हंगामांत त्याच्या खात्यात एकूण १०४ विकेट्स जमा आहेत.

नबी नुकताच श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाचाही सदस्य होता. त्या दौऱ्यात त्याने दोन सामन्यांत ६ विकेट्स घेत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते.

४३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये आकिब नबीने १८ च्या सरासरीने १६२ विकेट्स घेतल्या असून, एका डावात ५ किंवा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी त्याने १६ वेळा केली आहे. तसेच ३६ लिस्ट-ए सामन्यांत ५६ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला भारतीय कसोटी संघात संधी देण्याची मागणी गेल्या काही काळापासून होत होती.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरुवात होणार आहे. दुसरा कसोटी सामना २३ ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळविला जाईल. त्याआधी भारतीय संघ ७ ऑगस्टपासून श्रीलंका इलेव्हनविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा