29.4 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरस्पोर्ट्समहाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी किरण सावंत

महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी किरण सावंत

कार्यकारीणीची बिनविरोध निवड

Google News Follow

महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली. या निवडणुकीत पिंपरी चिंचवडचे किरण सावंत यांची अध्यक्षपदी निवड झाली.

पिंपरी-चिंचवड येथील ताथवडे परिसरातील सिल्वर बँक्वेट हॉल येथे या निवडणूक प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय क्रीडा संहिताच्या नियमांचे तंतोतंत पालन करून ही निवडणूक घेण्यात आली, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. यासाठी संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड. विक्रम रोठे यांनी विशेष परिश्रम घेतले

या निवडणूक प्रक्रियेसाठी इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनचे अध्यक्ष श्री स्वामी रमेश विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे निवडणुकीला राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व प्राप्त झाले होते.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. वेस्ली मेनेझीस यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांनी अत्यंत निष्पक्षपणे आणि कायद्याच्या चौकटीत राहून निवडणूक पार पाडली. तर इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनचे प्रतिनिधी श्री. लेस्ली जॉन पीटर हे निवडणूक निरीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले.

या निवडणुकीत कोणत्याही पदासाठी चुरस न होता सर्व पदाधिकारी बिनविरोध निवडून आले. यामुळे महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन मधील सर्व जिल्हा संघटना एकदिलाने आणि एका विचाराने काम करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. खेळाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येणे हीच खरी या निवडणुकीची यशस्विता मानली जात आहे.

हे ही वाचा:

दिल्लीत समाजविघातक लोकांनी एकत्र येऊन सरकार बदलत नसते!

उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमधील मतदार यादीतील १०,४७० नोंदींमध्ये फेरफार

मुंबईच्या वाहतुकीला ‘फास्ट ट्रॅक’!

दिवाळीआधीच सॅमसन, नमन धीरची आतषबाजी!

नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातून, तसेच विविध जिल्हा संघटनांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

नवनिर्वाचित कार्यकारीणी मंडळ

अध्यक्ष : किरण सावंत (पिंपरी चिंचवड)

उपाध्यक्ष

१) अजय खानविलकर (मुंबई)
२) राकेश कोसामकर (रायगड)
३) गोपाळ गायकवाड (नाशिक)

सरचिटणीस : शरद मारणे (पुणे)

खजिनदार : राजेंद्र चव्हाण (ठाणे)

सहचिटणीस

१) हेमंत खेबडे (नवी मुंबई)
२) सुनील शेगडे (मुंबई उपनगर)

कार्यकारिणी सदस्य

मोहन चव्हाण (जळगाव)
कुतुबुद्दीन सय्यद (छत्रपती संभाजीनगर)
जाफर खान (परभणी)
राजेश वडाम (कोल्हापूर)
दिया बगाडे (सातारा)
निशरीन पारीख (मुंबई)
नितीन म्हात्रे (ठाणे)

या नवनिर्वाचित कार्यकारिणीकडून महाराष्ट्रातील बॉडी बिल्डिंग खेळाडूंना न्याय मिळेल, जिल्हास्तरावर खेळाचा प्रचार-प्रसार होईल आणि महाराष्ट्र श्री सारख्या प्रतिष्ठित स्पर्धा अधिक भव्य दिव्य होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा