अंतिम फेरीत मेस्सीसमोर ५ ऐतिहासिक विक्रमांचे लक्ष्य!

अंतिम फेरीत मेस्सीसमोर ५ ऐतिहासिक विक्रमांचे लक्ष्य!

फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात गतविजेता अर्जेंटिनाचा सामना स्पेनशी होणार आहे. या महामुकाबल्यात अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी पाच मोठे विक्रम आपल्या नावावर करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

विश्वचषकात आतापर्यंत मेस्सीने ८ गोल केले आहेत. अंतिम फेरीत आणखी एक गोल केल्यास तो विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गोल करणारा सर्वात वयोवृद्ध खेळाडू ठरेल. सध्या हा विक्रम स्वीडनच्या निल्स लीडहोल्म (१९५८, वय ३५ वर्षे २६४ दिवस) यांच्या नावावर आहे.

याचबरोबर, अंतिम सामन्यात एक गोल करताच मेस्सी एका विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनेल. हा विक्रम सध्या गिलर्मो स्टाबिले (१९३० – ८ गोल) यांच्या नावावर असून, मेस्सीनेही यंदाच्या स्पर्धेत ८ गोल केले आहेत.

जर अर्जेंटिनाने स्पेनवर विजय मिळवत जेतेपद कायम राखले आणि मेस्सीने गोल केला, तर तो विश्वचषक विजेत्या संघाकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरेल. सध्या हा विक्रम ब्राझीलच्या रोनाल्डो (२००२ – ८ गोल) यांच्या नावावर आहे.

मेस्सीने अंतिम सामन्यात गोल केल्यास तो दोन वेगवेगळ्या विश्वचषक अंतिम सामन्यांमध्ये गोल करणारा जगातील सहावा फुटबॉलपटू बनेल. यापूर्वी हा पराक्रम वावा, पेले, पॉल ब्राइटनर, झिनेदिन झिदान आणि किलियन एम्बाप्पे यांनी केला आहे.

याशिवाय, स्पेनविरुद्धच्या अंतिम सामन्यात मैदानात उतरताच ३९ वर्षे २५ दिवसांचा मेस्सी विश्वचषक अंतिम फेरीत खेळणारा सर्वात वयोवृद्ध आउटफिल्ड खेळाडू ठरणार आहे.

अर्जेंटिनाने या विश्वचषकात एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली असून, आता मेस्सीच्या नेतृत्वाखाली सलग दुसरे विश्वविजेतेपद आणि इतिहास रचण्याचे लक्ष्य संघासमोर आहे.

Exit mobile version