28.2 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरस्पोर्ट्सशमीसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंदच!

शमीसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंदच!

Google News Follow

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाच्या आशांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली; मात्र शमीला पुन्हा एकदा डावलण्यात आले. विशेष म्हणजे, माजी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही शमीच्या निवडीचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे आता भारतीय संघात पुनरागमनाचे दरवाजे शमीसाठी बंद झाले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आगरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रज्ञान ओझा यांच्याकडे अंतरिम मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडण्यात आलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० संघात अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले. तब्बल चार वर्षांनंतर ३६ वर्षीय भुवनेश्वरला भारतीय संघात स्थान मिळाल्याने शमीच्या पुनरागमनाच्याही आशा उंचावल्या होत्या.

भुवनेश्वरला संधी मिळाल्यानंतर शमीचीही निवड होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली होती. विशेषतः जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत शमीला एकदिवसीय संघात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी जाहीर झालेल्या संघात शमीचे नाव नसल्याने त्याच्या चाहत्यांची निराशा झाली आहे.

शमीने ९ मार्च २०२५ रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले नाही. असे असले, तरी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये विविध प्रकारांत खेळताना आपली लय आणि तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. सध्या तो रणजी करंडक स्पर्धेतही खेळत आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करूनही त्याला राष्ट्रीय संघात संधी मिळत नसल्याने निवड समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय संघात प्रसिद्ध कृष्णा, अंशुल कंबोज, यश ठाकूर आणि औकीब नबी यांसारख्या गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. या निवडीमुळे शमीच्या अनुभवाचा आणि क्षमतेचा विचार नेमका का झाला नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आगामी २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाला आता साधारण वर्षभराचा कालावधी उरला असताना अनुभवी गोलंदाजाला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.

शमीची क्षमता काय आहे, हे त्याने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात दाखवून दिले होते. त्या स्पर्धेत अवघ्या सात सामन्यांत २४ विकेट्स घेत त्याने भारतीय गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०८ सामन्यांत २०६ विकेट्स घेणाऱ्या शमीचा अनुभव आणि भेदक गोलंदाजी ही भारतीय संघासाठी महत्त्वाची ताकद ठरू शकते.

दक्षिण आफ्रिकेतील वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर शमीची गोलंदाजी अधिक प्रभावी ठरू शकते, असेही मानले जाते. मोहम्मद सिराज आणि बुमराह यांच्यासारखे वेगवान गोलंदाज संघात असले, तरी शमीची जागा भरून काढणे सोपे नाही. असे असताना त्याला सातत्याने डावलले जात असल्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत अनिश्चितता वाढली आहे.

देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी, अनुभव आणि विश्वचषकातील प्रभावी योगदान असूनही शमीला संधी मिळत नसल्याने निवड समितीच्या भविष्यातील योजनांमध्ये त्याचे स्थान आहे की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. आता शमीला भारतीय संघात पुनरागमन

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा