29.4 C
Mumbai
Thursday, July 9, 2026
घरस्पोर्ट्समोरोक्कोचा स्टार बाहेर, फ्रान्सचा मार्ग सुकर?

मोरोक्कोचा स्टार बाहेर, फ्रान्सचा मार्ग सुकर?

Google News Follow

Related

फीफा विश्वचषक २०२६ मधील उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य फ्रान्सचा सामना करण्यापूर्वी मोरोक्कोला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख फॉरवर्ड इस्माईल सैबारी दुखापतीमुळे या महत्त्वाच्या सामन्यात खेळू शकणार नसल्याची अधिकृत घोषणा मुख्य प्रशिक्षक मोहम्मद ओआबी यांनी केली.

कॅनडाविरुद्धच्या प्री-क्वार्टर फायनल सामन्यात सैबारीच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. उपचार सुरू असले तरी तो वेळेत पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकला नाही. मात्र, मोरोक्कोने उपांत्य फेरी गाठल्यास २५ वर्षीय सैबारी पुनरागमन करेल, अशी आशा प्रशिक्षकांनी व्यक्त केली.

सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ओआबी म्हणाले, “सैबारी अद्याप तयार नाही. मात्र, त्याच्यासाठी हा स्पर्धेचा शेवट ठरू नये, अशी मला अपेक्षा आहे.”

या विश्वचषकात सैबारीने मोरोक्कोसाठी दमदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीतील तिन्ही सामन्यांत त्याने गोल केले होते. तसेच बाद फेरीत नेदरलँड्सविरुद्धच्या पेनल्टी शूटआऊटमध्येही त्याने महत्त्वाचा गोल नोंदवला होता. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत फ्रान्सविरुद्ध मोरोक्कोला अधिक बचावात्मक रणनीती अवलंबावी लागू शकते.

दरम्यान, फ्रान्स–मोरोक्को उपांत्यपूर्व सामन्यासाठी फिफाने संपूर्ण अर्जेंटिनाच्या पंचांच्या पथकाची नियुक्ती केल्याने चर्चा रंगली आहे. विश्वचषक २०२६ मध्ये प्रथमच एखाद्या सामन्यासाठी एकाच देशातील पंचांचे संपूर्ण पथक नियुक्त करण्यात आले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना ओआबी म्हणाले, “हा अतिशय अनुभवी पंच आहे. अशा मोठ्या सामन्यांसाठी अनुभवी पंचच हवेत. त्यामुळे आम्ही पूर्णपणे शांत आहोत. नेदरलँड्सविरुद्ध आमच्या सामन्यातही डच पंच होते आणि त्यांनी उत्कृष्ट काम केले. पंचांबाबत आम्हाला कोणतीही तक्रार नाही. ते नेहमीच सर्वोत्तम निर्णय देण्याचा प्रयत्न करतात.”

फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यात आतापर्यंत सर्व स्पर्धांमध्ये ६ सामने झाले असून त्यात फ्रान्सने ४ सामने जिंकले आहेत. १ सामना अनिर्णित राहिला, तर मोरोक्कोला केवळ १ विजय मिळवता आला आहे. याआधी २०२२ च्या विश्वचषक उपांत्य फेरीतही या दोन संघांची गाठ पडली होती. त्या वेळी फ्रान्सने मोरोक्कोचा २-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा