29 C
Mumbai
Wednesday, March 11, 2026
घरस्पोर्ट्स'मुंबई श्री' शरीरसौष्ठव स्पर्धा १३ मार्चला

‘मुंबई श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा १३ मार्चला

२५० पेक्षा अधिक पुरुष व महिला शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग

Google News Follow

Related

मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंच्या हृदयात सर्वोच्च स्थानी असलेल्या मुंबई श्री २०२६ या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा धमाका येत्या १३ मार्चला पंडित दीनदयाळ उपाध्याय मैदान, ज्या भवानी नगर, मालाड (पूर्व )येथे होणार आहे. या स्पर्धेला नगरसेवक ऍड. सिद्धांत शर्मा, विजय भोसले आणी जय भवानी व्यायाम मंदिर ट्रस्टचे पाठबळ लाभले आहे. या पीळदार थराराला यंदाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखाच दर्जा आणि विजेत्यांना मान-सन्मान दिला जाणार असल्याचे बृहन्मुंबई आणि उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी सांगितले.

शरीरसौष्ठवपटूंचे पहिले प्रेम असलेल्या आणि लखपती करणार्‍या या स्पर्धेच्या दर्जात कधीही घसरण झालेली नाही. कितीही संकटे असो किंवा आर्थिक अडचणींचा डोंगर उभा ठाकला असतानाही बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेने या स्पर्धेच्या आयोजनासाठी कधीही समझोता केलेला नाही.यंदाही त्यांनी त्याच थाटात आणि दिमाखात आयोजन करणार असल्याची माहिती खानविलकर यांनी दिली.

हे ही वाचा:

एसआरए प्रकल्पासाठी घर पाडल्याने वृद्धाचा मृत्यू

प्रेमसंबंधातील वादातून तरुणीची आत्महत्या; प्रियकराविरोधात गुन्हा

‘आयुष्यातील सर्वात मोठी चूक’ म्हणत सायली सुर्वेने स्वीकारला हिंदू धर्म

विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा पाऊस!

अडीचशे खेळाडूंचा सहभाग

मुंबई श्री म्हणजे दिमाखदार आयोजन नव्हे तर खेळाडूंना श्रीमंत करणारीr स्पर्धा. या लौकिकानूसार मुंबई श्री स्पर्धेत किमान २५० खेळाडू सहभाग घेतील, असा प्राथमिक अंदाज आहे. संदीप सावळे, मनोज बोचरे, विशाल धावडे, गणेश पेडामकर, अभिषेक लोंढे, सौरभ म्हात्रे, अमित साटम, अक्षय खोत, सुयश सावंत, चेतन नाईक, सारखे खेळाडू आपले मुंबई श्रीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करतील.
ही स्पर्धा एकंदर आठ गटात होणार असून गटातील अव्वल पाच खेळाडूंना व ‘किताब विजेता आणी उपविजेता यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येईल . या स्पर्धेत खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्यामुळे वजन तपासणी १३ मार्चला स्पर्धेच्या ठिकाणीच सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत केली जाणार असल्याची माहिती उपनगर संघटनेचे अध्यक्ष किट्टी फणसेक्का यांनी दिली.

फिजीक स्पोर्ट्स आणि महिला शरीरसौष्ठवाची वाढती क्रेझ

शरीरसौष्ठव खेळात आता राष्ट्रीय पातळीवर दिवसेंदिवस फिजीक स्पोर्ट्स आणि महिलांच्या शरीरसौष्ठवाची क्रेझ वाढू लागली आहे. स्पर्धेत स्पर्धकांचा सहभाग वाढत असल्यामुळे आयोजकांना या गटांकडेही आपले लक्ष केंद्रित करावे लागत आहे. पुरुषांच्या फिजीक स्पोर्ट्समध्ये खेळाडूंची सहभाग संख्या शंभराच्या आसपास असल्यामुळे हा गट दोन गटात विभागला गेला आहे. हे दोन्ही गट उंचीवर खेळविले जाणार असल्यामुळे त्यांची १७० सेमीपर्यंत आणि १७० सेमीवरील अशी विभागणी करण्यात आली आहे. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत मिस मुंबई या किताबासाठी संघर्ष होणार असल्यामुळे पुन्हा एकदा रेखा शिंदे आपले जेतेपद राखण्यासाठी प्रयत्न करील. तिला के लविना, राजश्री मोहिते, अपूर्वा पालव,वर्षा माने, यशोदा भोर आणि यांच्याशी तगडी लढत द्यावी लागणार असल्याची माहिती बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली.
या स्पर्धेतून मुंबई आणि मुंबई उपनगर संघाची निवड येत्या १५ मार्च रोजी पनवेल येथे होणाऱ्या महाराष्ट्र श्री या स्पर्धेसाठी करण्यात येईल

स्पर्धकांना संपर्काचे आवाहन

मुंबई श्री म्हटले की सहभागासाठी खेळाडूंची अक्षरशा झुंबड उडते. त्यामुळे कुणाचीही गैरसोय होऊ नये म्हणून सुनील शेगडे (९२२३३४८५६८), विशाल परब (८९२८३१३३०३), राजेश निकम (९९६९३६९१०८), राम नलावडे (९८७०३०६१२७), किरण कुडाळकर (९८७०३०६१२७), विजय झगडे (९९६७४६५०६३), जयदीप पवार (८०८०८०९४३८),
अब्दुल मुकादम (७९७७३२१८८५), गिरीश कोटियन (७७३८५४५२३०), सुभाष जाधव (९००४३१३४३९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा