मंगळवारपासून ओम ज्ञानदीप मंडळाची राज्यस्तरीय कबड्डी

कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर

मंगळवारपासून ओम ज्ञानदीप मंडळाची राज्यस्तरीय कबड्डी

ओम् ज्ञानदीप मंडळाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य व मुंबई शहर कबड्डी असो. च्या मान्यतेने आज १४ एप्रिल २०२६ रोजी सुरु होणाऱ्या हंगामातील पहिल्या पुरुष व्यवसायिक गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली. युवा पलटण विरुद्ध स्वामी समर्थ स्पोर्टस्, आणि भारत पेट्रोलियम विरुद्ध न्यू इंडिया एन्शुरन्स या दोन लढातीने या स्पर्धेला सुरुवात होईल.

यानिमित्ताने ओम् ज्ञानदीप मंडळाने प्रभादेवी, वरळी येथील कबड्डी रसिकाना प्रो-कबड्डी स्टार खेळाडूचा खेळ प्रत्यक्ष पहाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. वरळी, आदर्श नगर येथील वरळी स्पोर्टस् क्लबच्या मैदानावरील मॅटच्या २ क्रीडागणावर ही स्पर्धा सायं. ०६-०० ते १०-०० या वेळेत प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येईल.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आशाताई यांच्या भेटीचा असा होता रंजक किस्सा

मालदा हिंसाचार प्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते शाहदात आणि आसिफ अटकेत

पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाण सीमेजवळ चीनचा नवा प्रांत

इराण-अमेरिका शांतता चर्चेचे अपयश; सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळला

या स्पर्धेचे उदघाटन विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे व आमदार महेश सावंत यांच्या हस्ते सायं. ठीक ०६-०० वा. होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या १८ व्यावसायिक पुरुष संघांची ६ गटात विभागणी करण्यात आली. सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील. स्पर्धेची गटवारी आज प्रसार माध्यमाकरिता एका पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली.

पुरुष व्यावसायिक गट विभागणी :-
१) अ गट :- १) युवा पलटण, २) मुंबई पोस्टल, ३)स्वामी समर्थ स्पोर्टस्.
२) ब गट :- १) भारत पेट्रोलियम, २) पश्चिम रेल्वे, ३) न्यू इंडिया एन्शुरन्स.
३) क गट :- १) मुंबई बंदर, २)डी. पी. यु.-पुणे, ३)मुंबई महानगर पालिका.
४) ड गट :- १) मध्य रेल्वे, २)मिडलाईन-रायगड, ३) रूपाली ज्वेलस.
५) इ गट :- १)एच. ए. एल.-नाशिक, २) मीरा-भाईंदर महानगर पालिका, ३) जे. जे. रुग्णालय.
६) फ गट :- १) ठाणे महानगर पालिका, २) युनियन बंक, ३) हिंदुजा रुग्णालय.

Exit mobile version