29 C
Mumbai
Tuesday, April 28, 2026
घरधर्म संस्कृतीमीरा रोडमध्ये पहलगामची पुनरावृत्ती? धर्म विचारून सुरक्षारक्षकांवर वार

मीरा रोडमध्ये पहलगामची पुनरावृत्ती? धर्म विचारून सुरक्षारक्षकांवर वार

धर्म विचारून चाकूने हल्ला; आरोपीला बेड्या

Google News Follow

Related

मीरा रोडमधील नया नगर परिसरात सोमवारी पहाटे एक खळबळजनक घटना घडली. जैब अन्सारी या एका माथेफिरूने दोन सुरक्षारक्षकांना त्यांची जात-धर्म विचारून त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही रक्षक गंभीर जखमी झाले असून, परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला तातडीने अटक केली असून, आता या प्रकरणाचा तपास थेट ‘एटीएस’ने (दहशतवाद विरोधी पथक) आपल्या हाती घेतला आहे.

कलमा पढायला लावला, पण

मिळालेल्या माहितीनुसार, नया नगर परिसरात सुब्रतो सेन आणि मिश्रा हे दोन सुरक्षारक्षक कर्तव्यावर होते. पहाटेच्या सुमारास आरोपी त्यांच्याकडे आला आणि त्याने त्यांना त्यांच्या धर्माबाबत विचारणा केली. इतक्या वरच न थांबता, त्याने त्यांना ‘कलमा’ पठण करण्यास सांगितले. जेव्हा सुरक्षारक्षकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही, तेव्हा संतापलेल्या आरोपीने जवळ असलेला चाकू काढून दोघांवर सपासप वार केले.

हे ही वाचा:

तुर्कीयेत भारताची धुरंधर कारवाई; बडे साहाबला धक्का

क्लिप वारंवार पाहिली, दिशा बदलली नाही

“चप्पलमध्ये कॅप्टन… आणि प्रेझेंटेशनसाठी कॅमेरामनचे बूट!”

१० दिवसांत ४२ पाकिस्तानी सैनिक ठार

या हल्ल्यात मिश्रा आणि सेन हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. जखमींपैकी मिश्रा यांच्यावर मीरा रोड येथील व्होकहार्ट रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या सुरक्षा रक्षकावरही उपचार सुरू आहेत.

आरोपी अमेरिकेत शिकलेला

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या. तपासादरम्यान काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आरोपीचा जन्म मुंबईतील कुर्ला येथील असून तो मीरा रोडमध्ये एकटाच राहत होता. आरोपी २००० मध्ये शिक्षणासाठी अमेरिकेला गेला होता आणि २०१९ मध्ये तो भारतात परतला होता. घटनेचे गांभीर्य आणि हल्ल्याचे स्वरूप पाहता राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) या प्रकरणात उडी घेतली आहे. आरोपीचे कोणाशी संबंध होते का किंवा तो कोणत्या विशिष्ट विचारसरणीने प्रेरित होता का, याचा शोध घेतला जात आहे.

या घटनेनंतर मीरा रोड परिसरात अफवांचे पेव फुटले असून तणाव वाढला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नया नगर पोलिसांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आरोपीच्या मानसिक स्थितीचीही तपासणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा