30 C
Mumbai
Tuesday, April 28, 2026
घरसंपादकीयतुर्कीयेत भारताची धुरंधर कारवाई; बडे साहाबला धक्का

तुर्कीयेत भारताची धुरंधर कारवाई; बडे साहाबला धक्का

Google News Follow

Related

तुर्कीये हा देश कट्टरतावादी मुस्लीम देश आहे. पाकिस्तानचा घनघोर समर्थक आहे. काश्मीर प्रश्नावर सतत पाकिस्तानची री ओढत असतो. आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या शत्रूंना मदत करत असतो. असे असताना आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफीया सलीम डोलाच्या अटकेसाठी तुर्कीयेने भारताला मदत का केली? असा प्रश्न अनेकांच्या डोक्यात पिंगा घालतोय. कारण हा डोला म्हणजे पाकिस्तानचा जावई, आयएसआयचा फायनान्सर, ‘बडे साहाब’ दाऊद इब्राहीमच्या ड्रग्ज साम्राज्याचा आधारस्तंभ होता. तरीही सलीम डोलाच्या अटकेसाठी तुर्कीयेची गुप्तचर संस्था एमआयटी (मिल्ली इश्तीहबारात तेस्कीलाती) रिसर्च एण्ड एनालिसिस विंगसोबत काम का करत होती? याचाही अनेकांना उलगडा होत नाही.

सलीम डोला हा केवळ अंमली पदार्थांचा आंतरराष्ट्रीय तस्कर नसून तो दाऊद इब्राहिमच्या ‘डी-कंपनी’चा आर्थिक कणा मानला जातो. भारताचे धुरंधर त्याच्यावर नजर ठेवून होते. RAW गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या मागावर होती. डोला मुळचा मुंबईतील डोंगरीचा. गुटख्याच्या तस्करीपासून त्याने गुन्हेगारीची सुरूवात केली. २०१८ मध्ये त्याला ‘फेण्टानील’पासून बनवण्यात येणाऱ्या ‘बटन’ या ड्रग्जच्या तस्करी प्रकरणी सांताक्रुझ येथे अटक कऱण्यात आली होती. १०० किलोचा माल जप्त करण्यात आला होता.

जामीनावर बाहेर आल्यानंतर तो देशाबाहेर पळाला. त्याने यूएईत आश्रय घेतला. यूएई ही एकेकाळी गुन्हेगारीची मक्का होती. दाऊदने इथे मोठे साम्राज्य निर्माण केले होते. त्याच्या टोळीचा मोठा पैसा इथे गुंतला होता. डोलाने दुबईच्या रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. अनेक पॉश भागात महागडे व्हीला आणि अपार्टमेंट विकत घेतल्या होत्या. ड्रग्जच्या धंद्यात अफाट पैसा मिळत होता, त्यातून त्याने दाऊदचे ड्रग्जचे साम्राज्य मेक्सिको आणि आफ्रीकी देशात विस्तारले. तिथे डिझायनर ड्र्ग्जच्या निर्मितीसाठी प्रयोगशाळा आणि फॅक्टऱ्यांचे जाळे उभारले. भारत, पाकिस्तान, म्यानमारमध्येही त्याने मोठी यंत्रणा उभी केली. मुलगा ताहेर आणि साथीदार सलीम मोहम्मद सोहेल शेख यांच्या मदतीने तो हा धंदा चालवायचा. आयएसआय़चे संरक्षण असल्यामुळे पाकिस्तानात तो कुठेही येजा करू शकत होता. आज तो दाऊदच्या पाच हजार कोटीचे नार्को साम्राज्य सांभाळतो.

दाऊद पाकिस्तानात आहे हे उघड गुपित आहे. तो आयएसआयचा फायनान्सर आहे. ड्रग्जच्या धंद्यात दाऊद आणि आयएसआयची भागीदारी आहे. ड्रग्जच्या धंद्यात मोठा फायदा असतो. हेरॉईन, कोकेन, चरस, गांजा या पारंपरीक ड्रग्जसोबत अलिकडे जगात सिंथेटीक ड्रग्जचे पेव फुटले आहे. त्याला डिझायनर ड्रग्जही म्हणतात. यात होणाऱ्या फायद्याचा ४० टक्के हिस्सा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या वाट्याला जातो. भुके कंगाल झालेल्या पाकिस्तानला भारतात कारवाया करण्यासाठी हाच आर्थिक स्त्रोत उपयोगी पडतो. भारतातील स्लीपर सेल पोसणे, घातपात घडवणे, दंगे घडवणे, धर्मांतर, लव्ह जिहादसाठी पैसा पुरवला जातो.

गेल्या काही महिन्यात भारतातील ड्रग्ज कार्टेलच्या विरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये ईडीने सलीम डोलाशी संबंधित आठ ठिकाणांवर मुंबईत छापेमारी केली होती. काही जणांना अटक कऱण्याती आली होती. त्या आधी ऑगस्टमध्ये मुंबई पोलिसांनी सांगली, सुरतमध्ये एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड केला होता. ज्याचे धागेदोरे दुबई आणि तुर्कीयेपर्यंत असल्याचे तपासात उघड झाले. या रॅकेटचा संबंध सलीम डोलाशी असल्याचे उघड झाले. ईडीची कारवाई त्याच्यानंतर सुरू झाली.

हे ही वाचा:

भारत – न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार

क्लिप वारंवार पाहिली, दिशा बदलली नाही

१.६ लाख भाविकांनी घेतले केदारनाथ मंदिरात दर्शन

“चप्पलमध्ये कॅप्टन… आणि प्रेझेंटेशनसाठी कॅमेरामनचे बूट!”

भारतीय सुरक्षा संस्थांनी डोलाच्या साम्राज्याला धक्का द्यायला सुरूवात केली. आधी सलीमचा मुलगा ताहेर आणि साथीदार सलीम मोहम्मह सोहल शेख या दोघांना दुबईतून अटक करण्यात आली. त्यानंतर डोलाच्या विरोधात जाळे विणायला सुरूवात झाली.

RAW चे धुरंधर डोलाच्या मागे होते. त्याची खडानखडा माहिती काढली जात होती. त्याने युएईचा बनावट पासपोर्ट मिळवला असून तो आपली ओळख लपवून तुर्कियेमध्ये राहत असल्याची पक्की खबर RAW ला मिळाली. टेक्निकल इंटेलिजन्सचा वापर करून डोला इस्तंबूलमधील बयलिकदुझु येथे राहतो याचा छडा लावण्यात आला. त्याचे दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील ड्रग्ज कार्टेलशी असलेले संबंध RAW ने ट्रॅक केले होते. भारतातील दहशतवादी आणि फुटीरवाद्यांच्या कारवाया मोडून काढायच्या असतील तर त्यासाठी आधी त्यांचे आर्थिक स्त्रोत कापणे गरजेचे होते. कारण पैशाचा ओघ आटला की या कारवाया आपोआप बंद होतात.

यात सगळ्यात मोठा अडसर होता तुर्कीयेचा. या देशाचा कट्टर नेता तय्यीप एरदोगान याचे भारताशी वाकडे आहे. गेल्या वर्षी भारताने त्याला असा काही झटका दिला की तो थोडा ताळ्यावर आला होता. तुर्कीयेचे अर्थकारण डळमळीत झालेले आहे. तिथे गव्हाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. रशिया युक्रेन युद्धामुळे युक्रेनमधून होणाऱ्या गव्हाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. त्यामुळे भारताचाच आधार होता. तुर्कीयेने भारताला गहू पुरवण्यासाठी विनंती केली.

भारताने साफ दुर्लक्ष केले. कारण यापूर्वी भारताने पाठवलेला गव्हाचा कंटेनर तुर्कीयेने परत पाठवला होता. गव्हाचा दर्जा चांगला नाही, असे कारण पुढे केले होते. जगभरात भारताच्या गव्हाची बदनामी केली होती. त्यामुळे भारताने यावेळी तुर्कीयेला रडवले. गव्हाचा एक दाणाही पाठवला नाही. दुसऱ्या बाजूला तुर्कीयेचे शेजारी देश असलेल्या सायप्रस आणि ग्रीस या दोन देशांशी भारताने घट्ट संबंध बनवले. हे दोन्ही देश तुर्कीयेचे कडवे शत्रू आहेत. आपले परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर हे अत्यंत रोखठोक आणि परराष्ट्र धोरणाच्या प्रांतात अत्यंत मुरलेले आहेत. अडेलतट्टूंना वठणीवर आणण्याची कला त्यांना चांगलीच साध्य आहे. त्यांची मात्रा लागू पडली.

तुर्कीने चार पावले मागे घेत भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. घोषणा ८ एप्रिल २०२६ रोजी नवी दिल्लीत १२ व्या भारत-तुर्किये फॉरेन ऑफिस कन्सल्टेशन्स बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक चार वर्षे होत नव्हती. डॉ.जयशंकर यांनी दिलेल्या दणक्यानंतर तुर्कीयेला पुन्हा ही बैठक सुरू करायला भाग पाडले. तुर्कियेच्या उप-परराष्ट्र मंत्री बेरिस एकिंसी यांनी तुर्की शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. त्यांनी जाहीर केले की भारताच्या सुरक्षेला बाधा निर्माण करणाऱ्या घटकांना तुर्कीयेच्या भूमीवर थारा देणार नाही.

भारतीय बाजूने या चर्चेचे नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सिबी जॉर्ज यांनी केले होते. या उच्चस्तरीय बैठकीनंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी संयुक्तपणे सहकार्याचा हा नवा टप्पा अधोरेखित केला. मतभेद असतील परंतु आर्थिक आणि सुरक्षेच्या प्रांतात संवाद आणि समन्वय सुरू राहिला पाहिजे, असे या बैठकीत दोन्ही पक्षांनी मान्य केले.

गुप्तचर माहितीची देवाण घेवाण कऱण्यास दोन्ही देशांनी हिरवा कंदील दिला. तुर्कियेची राष्ट्रीय गुप्तचर संस्था एमआयटी आणि स्थानिक पोलीसांनी सलीम डोलाला अटक केली असली तरी RAW ने दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे ही अटक करण्यात आली.

RAW ने डोलाविरुद्धचे ठोस पुरावे आणि त्याच्या ‘नार्को-टेररिझम’मधील सहभागाचे रिपोर्ट तुर्कियेच्या यंत्रणांना दिले होते, त्यानंतरच ही संयुक्त कारवाई करण्यात आली. तुर्कीये येथून त्याल यूएईच्या ताब्यात देण्यात आली. यूएईने डोलाची रवानगी भारतात केली.

पाकिस्तानात बसलेला बडा साहेब या कारवाईमुळे निश्चित हादरला असणार. आय़एसआय़लाही मोठा झटका बसला आहे. डोलाची अटक हा डॉ.एस.जयशंकर यांच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचा विजय आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा