28 C
Mumbai
Wednesday, March 25, 2026
घरस्पोर्ट्सपीएसएल सोडून आयपीएलकडे खेळाडूंची धाव, PCBची कारवाईची धमकी

पीएसएल सोडून आयपीएलकडे खेळाडूंची धाव, PCBची कारवाईची धमकी

Google News Follow

Related

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे. पाकिस्तान सुपर लीग (PSL) सुरू होण्याच्या अगोदरच अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी पीएसएलला रामराम ठोकत थेट आयपीएलकडे धाव घेतली आहे. त्यामुळे पीसीबीची प्रतिमा पुन्हा एकदा धुळीस मिळाल्याची चर्चा रंगली आहे.

श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू दासुन शनाका हा PSL सोडणारा दुसरा मोठा खेळाडू ठरला आहे. त्याने लाहोर कलंदर्सची साथ सोडून आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने जखमी सॅम करनच्या जागी शनाकाला रिप्लेसमेंट म्हणून संघात घेतले आहे.

याआधी झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुजारबानी यानेही कोलकाता नाइट रायडर्ससोबत करार केल्यानंतर पीएसल मधून माघार घेतली होती. म्हणजेच, पीएसल सुरू होण्याआधीच खेळाडूंचा विश्वास डळमळीत झाल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे.

या सगळ्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पीएसल चेअरमन मोहसिन नकवी यांनी कडक इशारा दिला आहे.
“पीएसल सोडून जाणाऱ्या खेळाडूंवर आम्ही नियमांनुसार कारवाई करू. गेल्या वर्षीप्रमाणेच यावेळीही कठोर निर्णय घेतला जाईल,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

गेल्या वर्षीही असाच प्रकार घडला होता. कॉर्बिन बॉश याने PSL सोडून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती.

दरम्यान, गुडाकेश मोती, जेक फ्रेजर-मॅकगर्क, ओटनील बार्टमन आणि स्पेन्सर जॉन्सन या खेळाडूंनीही पीएसल मधून माघार घेतली आहे. त्यांनी वैयक्तिक कारणे दिली असली, तरी एकामागोमाग एक खेळाडू बाहेर पडत असल्यामुळे पीएसलची विश्वासार्हता पुन्हा प्रश्नचिन्हात आली आहे.

पीएसल २०२६ ची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. मात्र, पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा आता फक्त लाहोर आणि कराची या दोनच ठिकाणी खेळवली जाणार आहे. त्यातच सामने बंद दरवाज्यांआड खेळवण्याचा निर्णय घेतल्यामुळे पीसीबीवर टीकेची झोड उठली आहे.

एकूणच, पीएसल सुरू होण्याआधीच खेळाडूंचा पलायन, कमी झालेली स्पर्धेची चमक आणि पीसीबीची कारवाईची भाषा – या सगळ्यामुळे पाकिस्तान क्रिकेटची पुन्हा एकदा जागतिक स्तरावर नाचक्की झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा