30 C
Mumbai
Friday, September 11, 2026
घरस्पोर्ट्सपाकची बॅटिंग ‘फ्लॉप शो’; इंग्लंडने १९४ धावांनी धू धू धुतलं!

पाकची बॅटिंग ‘फ्लॉप शो’; इंग्लंडने १९४ धावांनी धू धू धुतलं!

Google News Follow

Related

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला १९४ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने दिलेल्या ३८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा दुसरा डाव अवघ्या १९४ धावांत आटोपला. या पराभवानंतर कर्णधार बाबर आझमने संघाच्या फलंदाजांवर नाराजी व्यक्त केली.

सामन्यानंतर बाबरने सांगितले की, संघाने नाणेफेक जिंकून ढगाळ वातावरणाचा फायदा घेण्यासाठी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली कामगिरी करत इंग्लंडला २९० धावांवर रोखले, मात्र फलंदाजांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही.

दुसऱ्या डावातही पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. विशेषतः वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बासने ५ बळी घेत प्रभावी मारा केला. मात्र, फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरल्याने पाकिस्तानच्या हातून सामना निसटला.

“आमच्याकडे संधी होती, पण आम्ही तिचा फायदा उठवू शकलो नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या,” असे बाबरने म्हटले.

बाबरने मोहम्मद अब्बासचे विशेष कौतुक केले. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर ५ बळी घेणे हा अब्बाससाठी संस्मरणीय क्षण असल्याचे त्याने सांगितले. तसेच साऊद शकीलच्या संयमी फलंदाजीचेही त्याने कौतुक केले.

या पराभवासह पाकिस्तानने तीन सामन्यांची कसोटी मालिका गमावली आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानचा एक डाव आणि १०३ धावांनी पराभव केला होता.

दरम्यान, पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच संघाला सलग चार डावांत २०० धावांच्या आत ऑलआउट होण्याची नामुष्की पत्करावी लागली आहे.

मालिकेतील तिसरी आणि अखेरची कसोटी ९ सप्टेंबरपासून एजबॅस्टन येथे खेळवली जाणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
332,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा