31.1 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरस्पोर्ट्ससूर्यकुमारच्या चिमुकलीच्या भजनाने मोदी भारावले

सूर्यकुमारच्या चिमुकलीच्या भजनाने मोदी भारावले

Google News Follow

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आपल्या निवासस्थानी भारतीय टी-२० संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव याची पत्नी देविशा शेट्टी आणि कुटुंबीयांसह भेट घेतली. धनत्रयोदशीच्या निमित्ताने झालेली ही भेट विशेष ठरली. या भेटीचा व्हिडिओ पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ‘एक्स’ खात्यावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव, त्याची पत्नी देविशा शेट्टी आणि त्यांच्यासोबत आलेल्या लहान मुलांशी संवाद साधताना दिसत आहेत. यावेळी एका चिमुकलीने सादर केलेल्या भजनाने पंतप्रधान मोदी चांगलेच मंत्रमुग्ध झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच सूर्यकुमार यादवची मे महिन्यात जन्मलेली मुलगी रिधिमा हिचीही या व्हिडिओमध्ये झलक पाहायला मिळाली. पंतप्रधानांनी रिधिमाला प्रेमाने जवळ घेत तिचे लाडही केले.

या भेटीचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिले की, दिवाळीच्या वातावरणात राम आणि सरयू यांचे आगमन झाले आहे. त्यामुळे दिवाळीचा माहोल आणखी पवित्र आणि दिव्य झाला आहे.

दरम्यान, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. स्वतःच्या मायभूमीत टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिलाच संघ ठरला होता. मात्र, कर्णधार म्हणून विश्वचषक जिंकूनही खराब वैयक्तिक कामगिरीमुळे सूर्यकुमारला पुढील मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

आगामी सय्यद मुश्ताक अली करंडक आणि विजय हजारे करंडक स्पर्धांसाठी सूर्यकुमार यादवकडे मुंबई संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये एकेकाळी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सूर्यकुमारने भारताकडून आतापर्यंत ११३ टी-२० सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ४ शतके आणि २५ अर्धशतकांसह ३ हजार २७२ धावा केल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा