30 C
Mumbai
Thursday, November 19, 2026
घरस्पोर्ट्सपरदेशातही टीम इंडियाचा भारतीय बाणा!

परदेशातही टीम इंडियाचा भारतीय बाणा!

Google News Follow

भारतीय क्रिकेट संघ परदेश दौऱ्यावर असला, तरी भारतीय सणांचा उत्साह काही कमी होत नाही. दिवाळी असो, होळी असो किंवा गणेशोत्सव… टीम इंडिया परदेशातही एकत्र येत हे सण मोठ्या उत्साहात साजरे करते. भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने परदेश दौऱ्यांदरम्यान भारतीय सण कशा पद्धतीने साजरे केले जातात, यामागचा खास अनुभव सांगितला.

‘फॅमिली फुल हाऊस’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना रोहितने भारतीय चाहत्यांचे आणि जगभरात पसरलेल्या भारतीय समुदायाचे महत्त्व अधोरेखित केले. भारतीय संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेत खेळत असला, तरी तेथील भारतीय चाहत्यांची उपस्थिती खेळाडूंना मायदेशात असल्याची जाणीव करून देते, असे त्याने सांगितले.

रोहित म्हणाला, ‘‘जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात भारतीय लोक राहतात. त्यामुळे आम्ही जेव्हा दुसऱ्या देशात खेळण्यासाठी जातो, तेव्हा भारतापासून दूर असल्याची भावना कधीच निर्माण होत नाही. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेत सामना असला, तरी भारतीय चाहते तिरंगा घेऊन मैदानात उपस्थित असतात.’’

परदेश दौऱ्यांदरम्यान दिवाळी, होळी आणि गणेशोत्सवासारखे सण एकत्र साजरे करण्याचा संघाचा प्रयत्न असतो, असेही रोहितने सांगितले. खेळाडू आपल्या कुटुंबापासून आणि घरापासून दूर असले, तरी संघातील सर्वजण एकत्र येऊन सणांचा आनंद लुटतात. अशा वेळी संघातील एकोपा अधिक दृढ होतो, असे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट झाले.

आपल्या आठवणी सांगताना रोहित म्हणाला, ‘‘आम्ही अनेकदा परदेशात होळी साजरी केली आहे, तर कधी दिवाळीचा आनंदही घेतला आहे. याचे व्हिडीओदेखील उपलब्ध आहेत. सणांच्या काळात आम्ही भारतात किंवा आपापल्या घरी नसतो. त्यामुळे संपूर्ण संघाने एकत्र येऊन सण साजरा करण्याचा आमचा प्रयत्न असतो.’’

दिवाळीच्या आठवणींना उजाळा देताना रोहितने मिश्किल टिप्पणीही केली. ‘‘दिवाळी तर आम्ही चांगलीच साजरी करतो, हे तुम्ही पाहिलेच असेल,’’ असे तो हसत म्हणाला.

भारतीय क्रिकेटपटूंसाठी परदेश दौरे म्हणजे केवळ सामने आणि सराव एवढेच नसतात, तर भारतीय संस्कृती आणि परंपरांशी जोडलेले राहण्याचीही ती एक संधी असते. मैदानावर प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करणारे खेळाडू सणांच्या निमित्ताने एकत्र येत भारतीय संस्कृतीचा आनंद घेतात. रोहित शर्माने सांगितलेला हा अनुभव टीम इंडियातील सांघिक भावना आणि भारतीय सणांप्रती असलेले प्रेम अधोरेखित करणारा आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा