31 C
Mumbai
Monday, February 9, 2026
घरस्पोर्ट्सशेफर्डची हॅट्ट्रिक; वेस्ट इंडिजचा विजयी गडगडाट!

शेफर्डची हॅट्ट्रिक; वेस्ट इंडिजचा विजयी गडगडाट!

Google News Follow

Related

दोन वेळा विश्वविजेतेपद पटकावलेल्या वेस्ट इंडिजने टी20 विश्वचषक २०२६ ची सुरुवात दमदार विजयाने केली. ‘ग्रुप सी’मधील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने स्कॉटलंडचा ३५ धावांनी पराभव केला. या विजयात शिमरॉन हेटमायर आणि रोमारियो शेफर्ड यांनी मोलाची भूमिका बजावली.

१८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडची सुरुवात खराब झाली. ७ धावांवर मायकेल जोन्स (१) बाद झाला. त्यानंतर जॉर्ज मुंसे आणि ब्रँडन मॅकमुलेन यांनी ३० धावांची भागीदारी केली. मॅकमुलेन १२ चेंडूत १४ धावा करून बाद झाला, तर ३७ धावांवर मुंसे (१९) तिसऱ्या विकेटच्या रूपाने माघारी परतला.

यानंतर कर्णधार रिची बेरिंग्टन आणि टॉम ब्रूस यांनी चौथ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी करत स्कॉटलंडला सामन्यात परत आणले. बेरिंग्टनने २४ चेंडूत ४२ धावा केल्या, तर ब्रूसने २८ चेंडूत ३५ धावा जोडल्या. मात्र १२२ धावांवर ब्रूस बाद झाल्यानंतर स्कॉटलंडची घसरगुंडी सुरू झाली.

१६ षटकांनंतर स्कॉटलंडचा स्कोअर ५ बाद १३२ असा होता. शेवटच्या ४ षटकांत ५१ धावांची गरज असताना १७वे षटक टाकण्यासाठी आलेल्या रोमारियो शेफर्डने सामन्याला कलाटणी दिली. शेफर्डने या षटकात हॅट्ट्रिकसह ४ बळी घेत वेस्ट इंडिजचा विजय जवळपास निश्चित केला. अखेर स्कॉटलंडचा डाव १८.५ षटकांत १४७ धावांवर आटोपला.

वेस्ट इंडिजकडून रोमारियो शेफर्डने ३ षटकांत २० धावा देत ५ बळी घेतले. जेसन होल्डरने ३ विकेट घेतल्या, तर शमार जोसेफ आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला.

यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ५ बाद १८२ धावा केल्या. शिमरॉन हेटमायरने ३६ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ६४ धावांची तुफानी खेळी केली. ब्रँडन किंगने ३५, रोवमन पॉवेलने २४ आणि शेरफेन रदरफोर्डने २६ धावांचे योगदान दिले.

स्कॉटलंडकडून ब्रॅडली करीने ४ षटकांत २३ धावा देत २ विकेट घेतल्या, तर सफयान शरीफ, ऑलिव्हर डेविडसन आणि मायकेल लिस्क यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला.

रोमारियो शेफर्डच्या घातक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने स्पर्धेची सुरुवात दणक्यात केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा