31.5 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरस्पोर्ट्सशुभमन गिलचा ‘सुपरमॅन’ कॅच

शुभमन गिलचा ‘सुपरमॅन’ कॅच

Google News Follow

श्रीलंकेविरुद्ध गॉलमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार शुभमन गिलने आपल्या अफलातून क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गिलने एका हाताने घेतलेल्या भन्नाट झेलामुळे श्रीलंकेचा फलंदाज कामिंदू मेंडिसचा डाव संपुष्टात आला.

श्रीलंकेच्या डावात कुलदीप यादव गोलंदाजी करत असताना कामिंदू मेंडिसने क्रीजमधून पुढे येत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हवेत उंच आणि वेगवान शॉट खेळला. मात्र, तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या शुभमन गिलने क्षणाचाही विलंब न करता आपल्या डाव्या बाजूला पूर्ण ताकदीने झेप घेतली आणि एका हाताने अप्रतिम झेल टिपला.

गिलचा हा कॅच पाहून मैदानातील प्रेक्षकांसह समालोचकांनीही त्याचे कौतुक केले. स्वतः कामिंदू मेंडिसलाही या झेलाने धक्का बसला आणि त्याला पॅव्हेलियनचा रस्ता धरावा लागला.

झेल पूर्ण केल्यानंतर गिलने आनंदाने चेंडू हवेत उंच उडवत या शानदार विकेटचा जल्लोष केला. ‘लेफ्ट हँड, फुल स्ट्रेच, अॅब्सोल्यूट स्टनर!’ अशा शब्दांत या झेलाचे वर्णन करण्यात आले.

गिलचा हा अप्रतिम झेल भारतासाठी महत्त्वाच्या क्षणी आला. श्रीलंकेच्या फलंदाजीवर भारतीय फिरकी गोलंदाज दबाव निर्माण करत असताना या विकेटमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास आणखी वाढला. त्यामुळे गॉल कसोटीत भारताची पकड अधिक मजबूत होताना दिसली.

शुभमन गिलच्या या सुपरमॅन कॅचचा व्हिडिओ सध्या क्रिकेटप्रेमींच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा