24 C
Mumbai
Wednesday, January 28, 2026
घरस्पोर्ट्सदक्षिण आफ्रिकेची मजबूत स्थिती, पहिल्या डावात ४८९

दक्षिण आफ्रिकेची मजबूत स्थिती, पहिल्या डावात ४८९

भारताने दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत केल्या ९ धावा

Google News Follow

Related

गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने आपली पकड मजबूत केली आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत कोणतीही विकेट न गमावता ९ धावा केल्या. भारत अजूनही दक्षिण आफ्रिकेपेक्षा ४८० धावांनी पिछाडीवर आहे.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. सलामीवीरांनी संघाला उत्तम सुरुवात करून दिली. एडेन मार्करम आणि रायन रिकेल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली.

पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्या शेवटच्या चेंडूवर मार्करम ३८ धावा करून बाद झाला. पुढील सत्राच्या सुरुवातीलाच रिकेल्टन (३५) देखील बाद झाला.  येथून ट्रिस्टन स्टब्सने कर्णधार टेंबा बावुमासोबत तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावा करून डाव सावरला. तिसऱ्या सत्रात बावुमा ४१ धावा करून बाद झाला. त्याच सत्रात स्टब्स (४९) सहित संघाने ४ विकेट गमावल्या.

हे ही वाचा:

पायलट नमांश स्याल यांच्या सर्वोच्च बलिदानाला देश कधीच विसरणार नाही

वैष्णोदेवी मेडिकल कॉलेजला देणग्या हिंदूंच्या; दाखले मात्र मुस्लिमाना

स्मृती मंधानाचा विवाह सोहळा स्थगित, वडिलांची तब्येत बिघडली

जपानच्या पंतप्रधान ताकाइची यांच्या विरोधात आंदोलन तीव्र

दक्षिण आफ्रिकेने २४६ धावांपर्यंत ६ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर सेनुरन मुथुसामीने काइल व्हेरेनसोबत सातव्या विकेटसाठी ८८ धावा जोडल्या. व्हेरेन ४५ धावा करून बाद झाला पण मुथुसामीने पकड गमावली नाही. त्यानंतर मुथुसामीने मार्को जानसेनसोबत आठव्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी करत संघाला भक्कम स्कोरकडे नेले. मुथुसामीने २०६ चेंडूंमध्ये २ षटकार आणि १० चौकारांसह १०९ धावा केल्या, तर जानसेनने ९१ चेंडूंमध्ये ९३ धावांची शानदार खेळी केली.

भारताकडून कुलदीप यादवने ४ विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत ६.१ षटकांत कोणतीही विकेट न गमावता ९ धावा केल्या. के. एल. राहुल २ आणि यशस्वी जायसवाल ७ धावा करून नाबाद आहेत. दक्षिण आफ्रिकेने आधीच मालिकेचा पहिला सामना ३० धावांनी जिंकला आहे. गुवाहाटी कसोटी जिंकून मालिका १-१ ने बरोबरीत सोडविण्याचा भारताचा प्रयत्न आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा