28.4 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरस्पोर्ट्सकिवींचं वादळ घोंघावणार; पाकिस्तानचा गेम ओव्हर?

किवींचं वादळ घोंघावणार; पाकिस्तानचा गेम ओव्हर?

Google News Follow

टी20 विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीची सुरुवात पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना शनिवारी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी गट फेरीत चारपैकी तीन सामने जिंकत आणि एक सामना गमावत सुपर-८मध्ये प्रवेश केला आहे.

पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान याने आतापर्यंत दमदार फलंदाजी केली आहे. त्याने चार सामन्यांत १६४ च्या स्ट्राइक रेटने २२० धावा केल्या असून नामिबियाविरुद्ध शतक झळकावले आहे. मात्र फरहानव्यतिरिक्त इतर फलंदाज अपेक्षेप्रमाणे चमकू शकलेले नाहीत. न्यूझीलंडविरुद्ध सैम अयूब, बाबर आझम आणि कर्णधार सलमान आगा यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

शादाब खानने पहिल्या फेरीत फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हींत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उस्मान तारिकनेही अचूक मारा करत बळी मिळवले आहेत. अतिरिक्त फिरकीपटूंसह मैदानात उतरण्याचा पाकिस्तानचा निर्णय आतापर्यंत फायदेशीर ठरला आहे.

न्यूझीलंडकडून टिम सायफर्ट सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने चार सामन्यांत १७३ धावा केल्या आहेत. कॅनडाविरुद्ध ग्लेन फिलिप्सने ३६ चेंडूंमध्ये ७६ धावांची खेळी करत फॉर्ममध्ये पुनरागमन केले आहे. गोलंदाजीत मॅट हेन्री आणि जेकब डफी यांनी सुरुवातीच्या षटकांत प्रभावी कामगिरी केली आहे. तसेच आर. प्रेमदासा मैदानावर मिचेल सॅन्टनर पाकिस्तानच्या फलंदाजांसाठी आव्हान ठरू शकतो.

आर. प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी साधारणतः संथ मानली जाते. येथे फिरकी गोलंदाजांना मदत मिळते आणि चेंडू थोडा अडखळत फलंदाजाकडे येतो. त्यामुळे मोठ्या धावसंख्या क्वचितच पाहायला मिळतात. या मैदानावरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १४४ आहे, तर दुसऱ्या डावातील सरासरी १२९ धावा आहे.

दरम्यान, सामन्यावर पावसाचे सावट आहे. सामन्यादरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून पावसाची सुमारे ७५ टक्के शक्यता वर्तवली जात आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत ४९ सामने झाले आहेत. त्यापैकी पाकिस्तानने २४ तर न्यूझीलंडने २३ सामने जिंकले आहेत. त्यामुळे सुपर-८मधील हा सामना अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा