29.8 C
Mumbai
Saturday, October 10, 2026
घरस्पोर्ट्सजपानने चांगली जिरवली; पण भारताने मॅच फिरवली!

जपानने चांगली जिरवली; पण भारताने मॅच फिरवली!

Google News Follow

Related

पावसामुळे प्रभावित झालेल्या एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाला जपानविरुद्ध मोठ्या उलटफेराचा सामना करावा लागता लागता वाचला. सानो इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंडवर रंगलेल्या या थरारक सामन्यात भारताने जपानचा अवघ्या २ धावांनी पराभव केला.

मुसळधार पाऊस आणि ओल्या मैदानामुळे नाणेफेक तब्बल दोन तास उशिराने झाली. त्यानंतर सामना प्रत्येकी ५ षटकांचा करण्यात आला. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, जपानच्या फिरकी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

अभिषेक शर्मा खाते न उघडताच माघारी परतला. संजू सॅमसनने ७ चेंडूंत ९ धावा केल्या, तर ईशान किशनला ६ चेंडूंत केवळ ३ धावा करता आल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने १२ चेंडूंत १६ धावांची खेळी केली. त्याने एक चौकार लगावला. तिलक वर्मा १ धावेवर नाबाद राहिला.

भारतीय संघाने संपूर्ण डावात केवळ दोन चौकार लगावले. एकाही फलंदाजाला षटकार मारता आला नाही. चार्ली हारा-हिन्जे हा जपानचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १७ धावा देत २ बळी घेतले. इब्राहिम ताकाहाशी आणि बेंजामिन इटो-डेव्हिस यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

शेवटच्या षटकात अक्षर पटेलची अचूक गोलंदाजी

भारताने दिलेल्या ३३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जपानची सुरुवात खराब झाली. अक्षर पटेलने पहिल्याच षटकात लॅकलन यामामोटो-लेकला १ धावेवर बाद केले. जपानने पहिल्या षटकात केवळ २ धावा केल्या.

दुसऱ्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने इब्राहिम ताकाहाशीला ४ धावांवर माघारी धाडले. मात्र, तिसऱ्या षटकात रवी बिश्नोईने १० धावा दिल्याने जपानच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या. चौथ्या षटकात सुंदरने ७ धावा देत जपानचा कर्णधार केंडेल काडोवाकी-फ्लेमिंगला १२ धावांवर बाद केले.

अखेरच्या षटकात जपानला विजयासाठी ८ धावांची गरज होती. अक्षर पटेलने पहिल्या दोन चेंडूंवर २ धावा दिल्या. तिसरा चेंडू वाइड ठरला. मात्र, त्यानंतरच्या चार चेंडूंवर अक्षरने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत जपानच्या फलंदाजांना चौकार-षटकार मारण्याची संधीच दिली नाही.

अखेर भारताने जपानला ५ षटकांत ३ बाद ३० धावांवर रोखत सामना २ धावांनी जिंकला. भारतीय संघ उलटफेराचा बळी ठरण्यापासून थोडक्यात बचावला आणि रोमांचक विजयाची नोंद केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा