ठाणे मनपा ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंचे यश

१२ सुवर्णपदकांसह २७ पदकांची घसघशीत कमाई

ठाणे मनपा ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंचे यश

ठाणे जिल्हा कनिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धा ११ आणि १२ जुलै २०२६ रोजी मौलाना अब्दुल कलाम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कौसा-मुंब्रा येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंनी दणदणीत यश मिळविले. या खेळाडूंनी सर्वसाधारण विजेतेपदावर नाव कोरले. योजनेच्या खेळाडूंनी या स्पर्धेत १२ सुवर्ण, १० रौप्य आमि ५ कांस्यपदके जिंकली आहेत.

१४ वर्षांखालील मुली – काव्या कांगले – १०० मीटर आणि ट्रायथलॉन ‘अ’ – सुवर्णपदक. इरा जाधव – ट्रायथलॉन ‘क’ – सुवर्णपदक. सई पालांडे – १०० मीटर आणि ट्रायथलॉन ‘ब’ – रौप्यपदक. दुर्वा रास्ते – ट्रायथलॉन ‘ब’ – कांस्यपदक.

१६ वर्षांखालील मुली – रिसा फर्नांडिस – ६० मीटर आणि लांब उडी – रौप्यपदक.

हे ही वाचा:

चीनच्या रेअर अर्थ निर्बंधांचा जागतिक उद्योगांना मोठा धक्का

जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट

हरित रेल्वे क्रांतीची नांदी; पहिली हायड्रोजन ट्रेन जींदहून सोनीपतसाठी रवाना

‘मेहनत, जिद्द, संस्कारांच्या बळावरच गाठता येते यशाचे शिखर’

१८ वर्षांखालील मुली – कानन देसाई – ४०० मीटर – सुवर्णपदक आणि २०० मीटर – रौप्यपदक.

२० वर्षांखालील मुली – श्रेष्ठा शेट्टी – १०० मीटर – रौप्यपदक. श्रुती फांसे – १५०० मीटर – रौप्यपदक आणि ८०० मीटर – कांस्यपदक.

१४ वर्षांखालील मुले – आरव विनेरकर – १०० मीटर आणि ट्रायथलॉन ‘क’ – रौप्यपदक. स्वराज पाटील – १०० मीटर – कांस्यपदक.

१६ वर्षांखालील मुले – अनिरुद्ध नंबूदरी – ६०० मीटर – सुवर्णपदक आणि ६० मीटर – कांस्यपदक. धैर्य सूर्यराव – ६० मीटर – सुवर्णपदक आणि लांब उडी – कांस्यपदक. स्नेह कामेरकर, धैर्य सूर्यराव, ध्रुव शिरोडकर आणि अनिरुद्ध नंबूदरी – मेडली रिले – सुवर्णपदक.

१८ वर्षांखालील मुले – मानस शिंदे – २०० मीटर आणि ४०० मीटर – सुवर्णपदक. नागेश सावंत – उंच उडी – सुवर्णपदक. तनिष लोटणकर – ४०० मीटर – रौप्यपदक. अभिज्ञान डे – उंच उडी – कांस्यपदक. विघ्नेश मुदलियार, तनिष लोटणकर, नागेश सावंत आणि मानस शिंदे – मेडली रिले – सुवर्णपदक.

२० वर्षांखालील मुले – गिरीक बांगेरा – ८०० मीटर – सुवर्णपदक आणि ४०० मीटर – रौप्यपदक.

ठाणे मनपा ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनाच्या खेळाडूंनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

खेळाडूंनी आपल्या क्षमतेनुसार उत्तम कामगिरी केली आहे. ज्युनियर हंगामाची ही एक चांगली सुरुवात आहे. आता आम्ही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तयारी सुरू करू, असे खेळाडूंचे प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी सांगितले. याप्रसंगी मीनल पालंदे (TMC) आणि अशोक आहेर (TMCAPY – योजना प्रमुख) यांनी सर्व खेळाडू व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आणि आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.”

Exit mobile version