28.2 C
Mumbai
Friday, July 31, 2026
घरस्पोर्ट्सगुरुपौर्णिमेला गुरुंना सुवर्णाची भेट

गुरुपौर्णिमेला गुरुंना सुवर्णाची भेट

Google News Follow

Related

कॉमनवेल्थ गेम्स २०२६ च्या सातव्या दिवशी भारताच्या पॅरा अॅथलीट्सनी दमदार कामगिरी करत पुरुषांच्या १०० मीटर टी४७ स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य अशी दुहेरी कमाई केली. दिलीप महादू गावित यांनी सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला, तर मोहम्मद बासिल यांनी रौप्यपदक पटकावले. सुवर्णपदक जिंकल्यानंतर दिलीप यांनी हे यश गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या गुरुंना समर्पित केले.

आयएएनएसशी संवाद साधताना दिलीप म्हणाले, “आज गुरुपौर्णिमा आहे. त्यामुळे हे सुवर्णपदक माझ्या गुरुंसाठी भेट आहे. लहानपणी मी झाडावरून पडलो आणि त्या अपघातात माझा एक हात अंशतः गमवावा लागला. त्यानंतर माझ्या प्रशिक्षकांनी मला धावताना पाहिले आणि माझ्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. घरची परिस्थिती कठीण असल्याने त्यांनी मला दत्तक घेतले. आज जे काही आहे, ते त्यांच्या पाठिंब्यामुळेच आहे. मी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतो आणि आज देशासाठी धावून सुवर्ण जिंकताना खूप आनंद झाला.”

दिलीप यांनी पॅरा खेळाडूंना मिळणाऱ्या सरकारी पाठिंब्याबद्दलही समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि सरकार पॅरा खेळाडूंना मोठा पाठिंबा देत आहेत. त्यामुळेच आम्ही देशासाठी पदके जिंकू शकत आहोत.”

लहानपणी अपंगत्वामुळे लोकांकडून हेटाळणी सहन करावी लागल्याची आठवण सांगताना ते म्हणाले, “लोक माझी खिल्ली उडवत होते, पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. माझ्या प्रशिक्षकांनी मला आधार दिला, आपल्या घरी ठेवले आणि घडवले. आता माझे संपूर्ण लक्ष ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्यावर आहे. आगामी आशियाई पॅरा स्पर्धेतही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन.”

दिलीप गावित यांनी १०.७१ सेकंद वेळ नोंदवत गेम्स विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. या विजयासह ते कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय पुरुष पॅरा अॅथलीट ठरले. तर मोहम्मद बासिल यांनी १०.८३ सेकंद वेळेसह रौप्यपदकाची कमाई करत भारताला ऐतिहासिक ‘वन-टू’ फिनिश मिळवून दिली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा